Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक बॉयफ्रेंड लोकल ट्रेनमध्ये भर गर्दीत उभा राहून गर्लफ्रेंडसाठी व्हिडीओ बनवताना दिसत आहे. हा वैतागलेला तरुण गर्लफ्रेंडला काय म्हणतो, हे तुम्हाला व्हिडीओत दिसून येईल. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू आवरणार नाही. सध्या हा मजेशीर व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण लोकल ट्रेनच्या डब्ब्यात भर गर्दीत उभा राहून व्हिडीओ बनवताना दिसत आहे. त्याच्या अवती भोवती एवढी गर्दी आहे की त्याला नीट उभं सु्द्धा राहता येत नाही. या गर्दीत तो व्हिडीओ रेकॉर्ड करत म्हणतो, “अगं पोरी तुला दहा वेळा सांगितलं इतके मला कॉल करत जाऊ नको. इथे श्वास घ्यायला जागा नाही तरी दहा वेळा कॉल करतेस. तुला असं का वाटतेय की मी इथे पोरींसोबत फिरत असतोस अगं मी एकटाच फिरत असतो. हे बघ. येथे सर्वांना विचार, मी तुझाच आहे किती वेळा खरं सांगू…” तरुणाचे हे बोलणे ऐकून लोकलमधील लोकांना हसू आवरत नाही. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

sachink__007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “विश्वास नावाची एक गोष्ट असते”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला खूप आवडलं, हे आरोग्यासाठी चांगलं आहे” तर एका युजरने लिहिलेय, “आ ग पोरी विश्वास कर ना त्याचा तो फक्त तुझाच आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “विश्वास नाही पण प्रेम आहे” एक युजर लिहितो, “प्रामाणिक फ्रस्ट्रेशन लेव्हल” तर एक युजर लिहितो, “मुलगी नशीबवान आहे, सोडू नको याला” अनेक युजर्सनी या मुलाची बाजू घेतली आहे. काही युजर्सनी या तरुणीच्या हिंमतीचे कौतुक केले आहे. या व्हिडीओवर ३ लाख ५४ हजारांहून अधिक लाइक आलेल्या आहेत.

Story img Loader