Viral Video : नुकताच देशभरात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणाचे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये स्टेजवर तरुणी डान्स करताना दिसत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ही तरुणी डान्स करताना दिसत आहे. हा डान्स कोणीही अवाक् होईल. (video of a young girl dance on 26 January by watching video netizens show anger video goes viral)

२६ जानेवारीला तरुणीने सादर केलेला डान्स पाहून नेटकरी संतापले

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मोठा स्टेज दिसेल. या स्टेजवर तिरंग्याची सजावट दिसत आहे. स्टेजच्या खाली महापुरुषांच्या फोटोला हार घातलेले दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुणी स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. ती “आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिये” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

पाहा व्हायरल व्हिडीओ

Virus Baba I.N.D.I.A Wala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनध्ये लिहिलेय, “कधी कधी वाटतं इंग्रज आपल्यापासून स्वतंत्र झाले”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “डान्स छान केला आहे पण दिवस व ठिकाण चुकले” तर एका युजरने लिहिलेय, “शाळांनी स्वातंत्राच्या नावावर अश्लील डान्स बंद करायला पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “याच्यापेक्षा गुलाम असतो तर बरं झालं असतं” एक युजरने लिहिलेय, “खरं आहे, इंग्रज आपल्यापासून स्वतंत्र झाले” तर एक युजर लिहितो, “हाच आहे का स्वातंत्र्याचा उत्सव” तर एक युजर लिहितो, “”अशा शाळांवर कारवाई केली पाहिजे” काही युजर्सनी या व्हिडीओवर टिका केली आहे तर काही युजर्सनी तरुणीच्या डान्सचे कौतुक केले आहे. काही युजर्सनी लिहिलेय, “डान्स चांगला होता पण ठिकाण योग्य नव्हते”

Story img Loader