Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल पण या तरुणाने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका कार्यक्रमात काही तरुण मंडळी डान्स करताना दिसतील. या तरुणांमध्ये एक तरुण एकटाच अतिशय सुंदर असा डान्स करताना दिसत आहे. तो डान्सचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. त्याच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. पुढे तुम्हाला दिसेल की तो त्याच्या एका मित्राला घेऊन कपल डान्स करताना दिसतो. मित्राबरोबर नाचतो. तरुणाचा येथे मिश्किल स्वभाव सुद्धा दिसून येतोय. त्याचा हा मनसोक्त डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
black_lover_9358 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना या तरुणाचा डान्स खूप आवडला आहे. एका युजरने लिहिलेय, “मी जसा मुलगा शोधत होते, हा तसाच आहे. काय डान्स करतो राव” तर एका युजरने लिहिलेय, “मी आठ ते दहा वेळा पाहिला व्हिडीओ, खूप सुंदर डान्स केला आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “डान्सबरोबर स्माइल पण खूप छान आहे” एक युजर लिहितो, “खूप सुंदर डान्स करतो भावा, असाच खूश राहा आणि डान्स करत राहा” तर एक युजर लिहितो, “मी या डान्स स्टेप्स नक्की शिकणार” एका युजरने लिहिलेय, “असा नवरा मला भेटला तर आयुष्य खूप चांगले होईल” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
या तरुणाचे नाव इंदू यादव असून याला इन्स्टाग्रामवर हजारो लोक फॉलो करतात. त्याला डान्स करायला आवडते आणि तो त्याच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या प्रत्येक व्हिडीओवर लोक कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करतात.