Shocking video: सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, डोंगरावर, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. अशाच एका तरुणीला आपला जीव धोक्यात घालून रील बनवणं चांगलंच महागात पडलंय.
नवीन वर्षाच्या सकाळी अनेकजण कुटुंबियांसोबत देवदर्शनासाठी गेले होते. सर्वांप्रमाणेही एक तरुणी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गायी मातेचे दर्शन करण्यासाठी गोठ्यात गेली अन जखमी होऊन आली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी गायीचा आशिर्वाद घेण्यासाठी गेलेली दिसत आहे, काही वेळात तरुणी गायीच्या पायाजवळ जाते, तेवढ्यातच गाय लाथ मारते आणि गायीच्या पायाखाली तरुणी येते. संपूर्ण व्हिडिओ तरुणीने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत कैद झालेला आहे. यावेळी तिचा व्हिडीओ काढणाराही आरडाओरड करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की, लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रीलमाफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच; पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. आता आणखी एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एका तरुणीला गाईच्या बाजूला रील बनवणं चांगलंच महागात पडलंय.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं” नवरीनं लग्नात केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही झाला लाजून लाल
जीव एवढा स्वस्त असतो का ?
सोशल मीडियावर हा व्हिडीओ pratahkal.live नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रसिद्धीझोतात येण्यासाठी तरुणाई स्टंट करताना दिसून येते. दिवसेंदिवस निरनिराळे स्टंट करण्याची जणू क्रेझच झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसून येतात. नेटकरीही हा व्हिडीओ पाहून संतापले आहेत. एकानं म्हटलंय, “जीव एवढा स्वस्त असतो का?” तर आणखी एक जण म्हणतोय, “काही क्षणांच्या आनंदासाठी असं नका करू.”