उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. देशभरात उष्णतेमुळे नागरिक हैरान झालेल्या नागरिक उष्णतेपासून वाचण्यासाठी फॅन, एसी, कुलरचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. दरम्यान आता वाढत्या उष्णतेचा एसीवर विपरित परिणाम झाल्याचे दिसत आहे. मुंबईतील एका उंच इमारतीतील एअर कंडिशनिंग कॉम्प्रेसरमध्ये लागलेल्या आग लागल्याची घडना उघडकीस आली आहे. एसीमधून येणाऱ्या आगीच्या ज्वाळांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून पायाभूत सुविधांवर अवलंबून असलेल्या शहरातील नागरिकांमध्ये तीव्र उष्णतेच्या परिणामाबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडिओमध्ये बिल्डिंगच्या खिडकीमधून धुराचे दाट लोट बाहेर येताना दिसत आहे. कारण AC कॉम्प्रेसरमध्ये बिघाड झाल्याने आग लागली आहे. आगीच्या ज्वाळा खिडकीतून बाहेर येताना दिसत आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद झाली नाही. पण य घटनेमुळे शहरातील उष्णतेच्या लाटेशी संबंधित संभाव्य धोके वाढल्याचे अधोरेखित केले आहेत आणि तापमान अभूतपूर्व पातळीपर्यंत वाढले आहे.

हेही वाचा – “जोर लगा के हईशा!”,भारत अन् चीनच्या सैन्यामध्ये रंगला रस्सी-खेचचा सामना! कोणी केली कोणावर मात? पाहा Viral Video

शेजारील ब्लिडिंगमधील व्यक्तीने हा व्हिडीओ शुट केला आहे, ज्यामुळे एअर कूलिंग सिस्टमच्या देखभाली आवश्यकतेकडे लक्ष वेधले आहे.

व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर चर्चा सुरू केली आहे, अनेक वापरकर्त्यांनी तीव्र हवामानाच्या घटनांमुळे शहरी पायाभूत सुविधांच्या असुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा – दिल्ली मेट्रोमध्ये लागली आग? काय आहे Viral Videoचे सत्य, DMRCने केला खुलासा!

एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, “माझा अंदाज आहे की आग एसी कंप्रेसरने नाही तर दुसऱ्या कशामुळे लागली आहे कारण स्प्लिट एअर कंडिशनरचे कंप्रेसर असलेले बाह्य युनिट बाल्कनीमध्ये आहे आणि ते सामान्य असल्याचे दिसते.” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “जेव्हा तुम्ही तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना योग्य देखभाल न करता १५-२० तास चालवून त्यांना अडथळा आणता तेव्हा हे घडले पाहिजे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of ac compressor fire in mumbai high rise due to extreme heat goes viral snk
Show comments