video of an elderly couple : सोशल मीडियावर सणासुदीनिमित्त ट्रेंड, चॅलेंज, कन्टेंट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. मग व्हिडीओ पाहून आपण भरपूर हसतो किंवा हा ट्रेंड नक्की करून पहिला पाहिजे असे अनेकदा ठरवतो. पण, आज एका वृद्ध जोडप्याने हे सगळे ट्रेंड, चॅलेंजला बाजूला ठेवून स्वतःचा एक खास व्हिडीओ शूट केला. वृद्ध जोडपं एका लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर लिप-सिंक करताना दिसले आहेत. त्यांचा हा अभिनय, त्यांच्यातील साधेपणा तुमचेही नक्कीच मन जिंकेल यात काही शंका नाही.

ऐश्वर्या राय, शाहरुख खान अभिनीत देवदास या आयकॉनिक चित्रपटातील हिट गाणे ‘बैरी पिया’ आपल्यातील अनेकांनी ऐकलं असेल. ‘बैरी पिया’ श्रेया घोषाल व उदित नारायण यांनी गायलं आहे. तसेच हे गाणे रोमँटिक आहे आणि हे गाणं जोडप्यासाठी त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी एक उत्तम पर्याय देखील ठरू शकते. तर आज आजी-आजोबांनी या गाण्यावर लिप-सिंक करत, खूप सुंदर अभिनय केला आहे. वृद्ध जोडप्याचा हा अभिनय तुम्ही सुद्धा व्हायरल व्हिडीओतून नक्की बघा…

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या

हेही वाचा…VIDEO : ‘खरा राजा माणूस…’ मुलींनी दिल सरप्राईज; बाबांच्या खांद्यावर हात ठेवून केला डान्स अन्… पाहा सुंदर क्षण

व्हिडीओ नक्की बघा…

आजी-आजोबांची केमिस्ट्री :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, आजीने सुंदर साडी नेसून, केसांची वेणी बांधून त्यात गजरा सुद्धा माळला आहे. तर आजोबांनी पांढरा शर्ट घातला आहे आणि गाण्याच्या प्रत्येक ओळीवर दोघेही सुंदर अभिनय करताना दिसत आहेत. आजी-आजोबांची केमिस्ट्री, त्यांचे मोहक भाव, गाण्याच्या बोलांशी त्यांची लिप-सिंक आणि त्यांच्यातील प्रेम या व्हिडीओत अगदी खुलून दिसते आहे. त्यामुळे हा व्हिडीओ नऊ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @attachments_wtf या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओतील आजी-आजोबांची सादगी, त्यांचा अभिनय पाहून हे खरे इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहेत असे अनेक जण म्हणू लागले. एका युजर कमेंट केली की, ‘जर माझा होणारा नवरा माझ्याबरोबर असा व्हिडीओ बनवणार नसेल तर मला लग्नच नाही करायच’ , तर दुसरा म्हणतोय की, ‘जोडीदारबरोबरचं नातं इथपर्यंत असलं पाहिजे’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader