Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही डान्स व्हिडीओ मजेशीर असतात तर काही डान्स व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण डान्स करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. आजीबाईचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आजीबाई एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात डान्स करत आहे. ती स्टेजवर मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. आजीबाईबरोबर तिच्या काही तरुणी सुद्धा डान्स करताना दिसत आहे. आजीबाईच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. आजीबाई डान्सचा आनंद लुटताना दिसत आहे. आजीबाईची ऊर्जा पाहून तरुण मंडळी लाजतील. या व्हिडीओवर लिहिलेय, “प्रॉब्लेम तर सगळ्यांना असतात आयुष्यात पण त्याबरोबर आयुष्य जगता आलं पाहिजे मग त्याला वयाची मर्यादा नसते.”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

maz_man_tuzyat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आयुष्य सुंदर आहे पण जगता आलं पाहिजे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजीने आपल्या नृत्यातूनच आपल्या भावना आणि हावभावातुनच सांगून दिले. जीवन हे आनंदानेच जगायचे असते. प्रॉब्लेम्स तर देवांना असते. असे जगता आहे पाहिजे.” तर एका युजरने लिहिलेय, “आजी खूप खूप सुंदर. तुमच्याकडे बघून ना खूप स्त्रियांना असं वाटेल खरोखर आपण जीवनामध्ये आनंद हा घेतलाच पाहिजे.. आपण आपल्या पद्धतीने आपलं जीवन कसं आनंदी होईल हे आपल्याला कळलं पाहिजे. खूप खूप सुंदर. छान मस्तच” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजीने दाखवून दिले, आयुष्य सुंदर आहे आणि जगता आले पाहिजे” एक युजर लिहितो, “वाह खूप छान डान्स करतात आज्जी” तर एक युजर लिहितो, “आज्जी जोमात… पब्लिक कोमात… “