Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. काही लोक सोशल मीडियावर त्यांची कला सादर करतात तर काही लोक त्यांचे अनुभव शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण एका आज्जीविषयी सांगताना दिसत आहे.

या तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये तुम्हाला आज्जीबाई दिसेल. तिने नऊवारी नेसली आहे. तिने डोक्यावर भारी पोते उचलले आहे आणि तिच्या दुसऱ्या हातात सुद्धा पोते आहे. एवढं सगळं ओझं घेऊन ती मोठ्या हिंमतीने चालताना दिसत आहे.
या व्हिडीओत तुम्हाला या तरुणाचा आवाज ऐकू येईल. तो म्हणतो, “आरामाने जावा”

वयाच्या सत्तरीत पोटापाण्यासाठी आज्जी उचलते डोक्यावर कचऱ्याचं ओझं

या तरुणाने कॅप्शनमध्ये या आज्जीविषयी सांगितले आहे, “परवा चहा टपरीजवळ एक आजी बाटल्या वेचताना दिसल्या… माझ्या लक्षात आलं की आपल्या कंपनीजवळ बाटल्यांचा ढीगच जमा झालाय.
मी तिला सांगितलं – ‘ताई, उगाच इकडेतिकडे फिरू नका, मीच रोज बाटल्या देतो तुम्हाला.’
त्या दिवशी मी बाटल्या दिल्यावर, आजी म्हणाल्या,
‘तुला पैसे द्यायचेत का?’
मी सहजच उत्तर दिलं,
‘नको आजी, तुमचा आशीर्वादच खूप आहे माझ्यासाठी.’
बोलता बोलता त्यांचं जीवन उलगडत गेलं…
आज्जीने सांगितले, “मुलगा कोरोनात गेला… दोन नातवंडं आणि सुन – ती घरकाम करते, आणि मी हे सगळं करून घर चालवते.”

वय सत्तर, पण अजूनही रोज सकाळी उठून कचरा वेचून जगण्याची लढाई लढणारी एक ‘रखुमाई’. आज राम नवमीच्या दिवशी मला पुन्हा एकदा जाणीव झाली.”

पाहा व्हिडीओ (Watch viral video)

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माझी आई अशीच होती… नऊवारी नेसणारी… कधी न थकणारी… मुलांसाठी जीवाचे रान करणारी” तर एका युजरने लिहिलेय, “त्या माता माऊली चे मनापासून आशीर्वाद लागतील” आणखी एका युजरने लिहिलेय, “आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली मानस जास्त आनंद देतात.” एक युजर लिहितो, “प्रत्येकाच आयुष्य संघर्षाने भरलेलं आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हॉर्टचे इमोजी शेअर केले आहेत.