Viral Video of Dance : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहानपणापासून वृद्धांपर्यंत अनेक जण डान्स करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक आज्जीबाई तुफान डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ साखरपुड्याच्या कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये आज्जीबाई तरुणांबरोबर, महिलांबरोबर तसेच आजोबांवरून डान्स करताना दिसत आहे. आजीची ऊर्जा पाहून कोणीही थक्क होईल.
आज्जीने काय डान्स केला राव! काय ती ऊर्जा, काय तो जोश; तरुणांनाही टाकले मागे
हा व्हायरल व्हिडीओ एका साखरपु्ड्याच्या कार्यक्रमातील आहे. एक तरुण एका आजीबाईला स्टेजवर घेऊन येतो आणि नवरी नवरदेवाबरोबर डान्स करण्यास विनंती करतो. तेव्हा आज्जी बिनधास्त डान्स करताना दिसते. नव्या जोडप्याबरोबर तसेच तरुण तरुणींबरोबर डान्स करताना दिसते. आज्जीच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्यानंतर आज्जी आजोबांबरोबर कपड डान्स करताना दिसते. आज्जी डान्सचा पुरे पूर आनंद घेताना दिसत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
dj_pandeyy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वय डान्सरच्या हृदयाची ज्योत विझवू शकत नाही.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वय हा फक्त आकडा आहे” तर एका युजरने लिहिलेय, “आज्जीचा आनंद पाहून खरं मन भरून आलं”
आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह, आज्जीबाईने माझा दिवस बनवला. देव करो तिला नेहमी असाच आनंद व्यक्त करण्याची संधी मिळो.” एक युजर लिहितो, “काय एनर्जी आहे, क्या बात है” तर एक युजर लिहितो,”माहित नाही पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मला आनंद वाटतो” तर एक युजर लिहितो, “मला वाटते, “ती प्रोफेशनल डान्सर असावी” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. दोन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. काही युजर्सनी आज्जीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यापूर्वी सुद्धा असेच वृद्धांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.