Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्व जण त्यांच्या कला सादर करताना दिसतात. कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो तर कधी कोणी डान्स करताना दिसतो. कधी कोणी मिमिक्री करताना दिसतो तर कधी कोणी भन्नाट जुगाड सांगताना दिसतो. सोशल मिडिया हे माहिती शेअर करण्याचं एक उत्तम माध्यम आहे. अनेकदा यावरील व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरले तर अचानक व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा भन्नाट कविता सादर करताना दिसत आहे. ही कविता ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल. ही कविता बायका आणि त्यांच्या वयावर आधारीत आहे. कवितेचं नाव आहे, “बायकांचं कळत नाही, त्या वयाला का स्वीकारत नाही..” ( video of an old man funny poem goes viral on social media said I do not understand about women why they do not accept age )
“बायकांचं कळत नाही, त्या वयाला का स्वीकारत नाही..” आजोबांनी सादर केली भन्नाट कविता
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला आजोबा दिसेल. हे आजोबा स्टेजवर उभे राहून माइकसमोर कविता सादर करताना दिसत आहे. ते म्हणतात,
“सादर करतो
बायकांचं कळत नाही
बायकांचं कळत नाही
त्या वयाला का स्वीकारत नाही..
हेअर डाय, पावडर लिपस्टिकने तात्पुरती डागडुजी होते पण वय कमी होत नाही..
पण त्यांना तस कळत नाही
मला नेहमीच पडणारा प्रश्न त्या वयाला का स्वीकारत नाही.
धीर करून बायकोला विचारलं
लग्न ठरवताना तरी खरं वय सांगितलं की नाही
फनकाराने म्हणाली मला विचारू नका माझे घरचे सांगतील सर्व काही
उत्सुकतेपोटी सासऱ्यांना विचारलं तर म्हणाले हाच प्रश्न मी माझ्या बायकोला केलेला…”
पाहा व्हायरल व्हिडिओ (Watch Viral Video)
nivrttiighuge या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बरोबर आहे मामा” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान कविता आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “या पुढची ओळ सांगतो, सासरा म्हणाला अजून पर्यंत मला पण उत्तर मिळालं नाही” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.