दिवाळीला फटाके फोडण्याची एक वेगळीच मजा असते. लोक या कामात किती क्रिएटीव्ह असू शकतात, याचे उदाहरण एका IFS अधिकाऱ्याने शेअर केलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आले आहे. त्यांनी शेअर केल्यानंतर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. फटाके वाजवताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून असा धक्कादायक प्रयत्न करण्याचं धाडस अजिबात करू नका असा सल्लाही देण्यात येतोय.

लहान मुले असो वा मोठी माणसं, सर्वांनाच फटाके फोडायला आवडतात. यामध्ये अनेकजण इतके निष्णात असतात की ते बिनधास्त न घाबरता फटाके फोडतात. सिगारेटच्या मदतीने रॉकेट उडवणारी एक व्यक्ती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या व्यक्तीचा हा व्हिडीओ जुना असला तरी दिवाळीच्या मुहूर्तावर तो पुन्हा एकदा चांगलाच व्हायरल होत आहे. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यानंतर लोक हा व्हिडीओ शेअर करत त्यावर मजेदार कमेंट करताना दिसून येत आहेत.

IFS अधिकारी सुशांत नंदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि ट्विटरवर अनेकदा प्राण्यांशी संबंधित इतर आश्चर्यकारक व्हिडीओ शेअर करतात. दिवाळी जवळ आली असताना असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ बराच जुना असला तरी IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ज्या प्रकारची कमेंट पोस्ट केली आहे, त्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : या मुलाने घराची भिंत नव्हे, वही किंवा कागद नव्हे तर पांढरी शुभ्र कार रंगवली!

आणखी वाचा : शार्कसोबत पाण्यात रोमँटिक डान्स करताना दिसला हा माणूस, VIRAL VIDEO पाहून हैराण व्हाल!

व्हिडीओमध्ये एक मध्यमवयीन माणूस रस्त्याच्या मधोमध उभा असलेला दिसतोय, त्याच्या हातात रॉकेटचा एक गठ्ठा दिसतोय. त्याने तोंडात सिगारेट धरलेली दिसत आहे आणि त्या सिगारेटने एक एक रॉकेट पेटवत आहे. त्याचे हावभाव बघून त्याला फटाक्यांची अजिबात भीती वाटत नाही असंच दिसतंय. हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “NASA चे संस्थापक भारताचे असतील!” असं लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. दिवाळीत पुन्हा व्हायरल झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत ८ लाख लोकांनी पाहिला आहे. तर २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय.

Story img Loader