Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. हल्ली पाट्यांचे अनेक व्हिडीओ तुम्ही बघत असाल. कधी मजेशीर तर कधी थक्क करणारे मेसेज लिहिलेल्या पाट्या सोशल मीडियावर व्हायरल होतात.

पूर्वी या पाट्या एखाद्या घराच्या दरवाज्यावर, सार्वजानिक ठिकाणी भिंतीवर, कार्यालयात, इमारतीच्या ठिकाणी दिसायच्या पण आता या पाट्या वेगवेगळ्या स्वरुपात अनेक ठिकाणी दिसून येतात. काही तरुण मंडळी पाटीवर संदेश लिहितात आणि ती पाटी हातात घेऊन उभे राहतात तर काही लोक गाडीवर किंवा ऑटो रिक्षावर हे संदेश लिहितात.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका ऑटोरिक्षाने भन्नाट संदेश लिहिला आहे. रिक्षाचालकाने नेमकं काय लिहिलेय, हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक ऑटो रिक्षाचालक रिक्षेत बसलेला दिसत आहे. त्याच्या रिक्षाच्या आत एक संदेश लिहिलाय आहे. हा संदेश इंग्रजी हिंदी अशा दोन्ही भाषेमध्ये लिहिलाय, “Be with someone jiske saath auto bhi Mercedes lage” (अशा व्यक्तीबरोबर राहा ज्याच्यासोबत ऑटो सुद्धा मर्सिडीज वाटेल.) हा संदेश वाचून कोणीही थक्क होईल. व्हिडीओवर लिहिलेय, “ऑटोचालकाचा विचार मनाला स्पर्श करून गेला” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ, खालील लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/reel/DF5YZZfP-k2/?igsh=MTc0c3BkZWJmNjQwaA%3D%3D

writerprashant या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्पर्श करून गेलं”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मनाला स्पर्श करून गेली गोष्ट पण काका या पिढीच्या मुलांना नाही कळणार” तर एका युजरने लिहिलेय, “खरे शब्द आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह क्या बात है.. किती सुंदर वाक्य आहे” एक युजर लिहितो, “बिझिनेस माइंड प्लस भावना” तर एक युजर लिहितो, “लक्झरी लाइफ नाही तर लक्झरी मन पाहिजे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.