भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी सुप्रिया साहू (IAS अधिकारी सुप्रिया साहू) यांनी अलीकडेच ऑलिव्ह रिडले कासव (Olive Ridley turtles) या शेकडो वर्षे जुन्या कासवांच्या एका प्रजातीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या छोट्या कासवांना समुद्रात सोडण्यापूर्वीचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये कार्यकर्ते अलीकडेच जन्मलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांना हळूवारपणे चेन्नईच्या समुद्रात सोडताना दिसत आहेत. हे दृश्य पाहून तुमच्या अंगावर काटा येऊ शकतो.
X वरील एका लांबलचक पोस्टमध्ये, सुप्रिया साहू यांनी शेअर केले की, कासवाची ही प्रजाती २०० दशलक्ष वर्षांपूर्वी डायनासोरच्या काळातील आहे. कासवांविषयी आणखी एक मनोरंजक माहिती सांगताना साहू म्हणाल्या, की” ही छोटेसे कासव कवच फोडण्यासाठी तात्पुरत्या दातांचा वापर करतात.”
हेही वाचा – चीनमध्ये आता तळहात स्कॅन करून दिले जातात पैसे! ‘Palm Payment’चा व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सुप्रिया साहू यांनी लिहिले की, “आमच्या वन विभागाच्या ऑलिव्ह रिडले टर्टल हॅचरीमधून चेन्नईच्या बेसंत नगर बीचवर पहिल्या समुद्र प्रवासासाठी या छोट्या कासवांना पाहून अंगावर काटा येत आहे. या कासवांच्या प्रजाती डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात असून २०० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या आहेत. या धाडसी कासवांबद्दल अनेक अविश्वसनीय तथ्ये आहेत जे ऐकून तुम्ही अवाक व्हाल. अंडी फोडण्यासाठी ते तात्पुरते दात वापरतात ज्याला कार्बंकल म्हणतात. अंडी साधारणपणे ४५-६० दिवसांत उबतात आणि कासवाचे पिल्लू बाहेर येते वाळू खोदत पहिल्यांदा डोके वर काढतात. त्यांच्या पोटावर एक अंड्यातील पिवळ बलक पिशवी देखील आहे जी त्यांना पोहण्यासाठी आणि समुद्रात सोडल्यावर प्रवास करण्यासाठी पोषक तत्व प्रदान करते. निसर्गाचा चमत्कार खरोखर कासवांच्या प्रजांतीमध्ये दिसून येतो.”
एक्स वर साहू ची पोस्ट इंटरनेटवर खूप चर्चेत येत आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. लोकांनी यावर कमेंट करत आश्चर्य व्यक्त केले आहे. एका व्यक्तीने लिहिले, “वाह, उत्कृष्ट वर्णन, मॅडम. आशा आणि प्रार्थना करतो की कासवाची पिल्ल समुद्रात सुरक्षित आणि स्वस्थ राहोत.” दुसऱ्याने लिहिले, खरोखर निसर्गाचा चमत्कार आहे”