साप म्हटलं तरी अनेकांच्या काळजात धडकी भरते अन् चिमुकला चक्क सापाबरोबर खेळत आहे. सोशल मीडियावर काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये लहान बाळ सोप्यावर बसला आहे, ज्यासमोर एक खराखुरा साप आहे. लहान बाळ सापाबरोबर खेळण्याप्रमाणे खेळतो आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता की,”एका मुलाला सापाबरोबर खेळताना दिसत आहे जणू ते काही खेळणे आहे तो मुलगा एका सोफ्यावर बसलेला दिसतो आणि चिमुकल्याने त्याच्या खांद्यावर साप घेतलेला आहे. प्रथम, तो मुलगा सापाला दोन्ही हातांनी पकडतो, तो त्याच्या तोड पकडतो घेतो आणि त्याला खुर्चीवर आपटतो. तो साप पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण तो मुलगा त्याला नीट पाहण्यासाठी स्वत:च्या जवळ आणतो. सापाला जीभ बाहेर काढताना पाहून उडवताना तो घाबरतो आणि त्याला सोफ्यावरून ढकलण्याचा प्रयत्न करतो. स्पष्ट धोका असूनही, तो मुलगा शांत राहतो, जीवघेण्या धोक्याची त्याला जाणीव नसते.धक्कादायक म्हणजे हे सर्व घडत असताना त्याला वाचवायचे सोडून त्याचे पालक त्याचा व्हिडिओ शुट करत आहे.

व्हिडिओ (vivek_choudhary_snake_saver) याने पोस्ट केला आहे. व्हिडीओखाली कॅप्शन देत “रितेश चौधरीचा आणखी एक धमाका” असे कॅप्शन दिले आहे. सर्पमित्र विवेक चौधरी यांनी आपल्या मुलाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. नेटकऱ्यांनी या कृतीवर रोष व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांना खूप चिंता वाटली आहे. एका वापरकर्त्याने कमेंट केली, “इतकही अति करू नये की मुलांच्या जीवाचे काही नुकसान होईल, भावा, मुलाची काळजी घे, लाईकच्या नादात मुलांना काहीतरी होईल.”

दुसऱ्या एका युजरने लिहिले, “मुलाला हे काय आहे हे माहित नाही… पण जर चुकून खरा साप दिसला आणि मुलाने तो पकडला तर तो आपला जीव गमावू शकतो.”

तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “भाऊ, मुलाला ही मस्करी आवडली नाही. तू मुलाच्या जीवाशी खेळत आहेस, या प्राण्याचा काही भरोसा नाहीये.”