पैसा अडका, दाग दागिने म्हणायला गेले तर सारी श्रीमंती त्या देशातील स्त्रियांच्या पायाखाली लोळण घेणे. पण जर स्वच्छंदी जगण्याचा आनंदच मिळत नसेल तर पैसा अडका काय कामाचा? सोन्याच्या पिंज-यात कैद केलेल्या एका पक्षाची अवस्था असते त्याहूनही कैक पटींने वाईट जीवन अनेक सौदी स्त्रियांच्या वाटेला येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा: भाजीवालीचा उपक्रम, घरात शौचालय दाखवा आणि १ किलो टोमॅटो मोफत मिळवा

घरातून बाहेर पडायचे नाही, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही, नव-याच्या आज्ञेत राहायचे, फार मिसळायचे नाही अशा एक ना दोन कितीतरी सूचनांचे आणि आदेशांचे पालन त्यांना करावे लागते. स्वत:चे असे अस्तित्त्व त्यांना नसते. नव-याशिवाय घराबाहेर पडायचे नाही, मुक्तपणे मत मांडायची नाही, बुरखा घालून वावरायचे, गाडी चालवायची नाही यासा-या गोष्टीची जबरदस्ती असते ती वेगळीच. पण अशा महिलांच्या वाटेला जर एक दिवस मुक्तपणे जीवन जगण्याची संधी आली तर त्या काय करतील? अशी कल्पना करून ‘एटीज’ने एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. सारे गाणे काल्पनिकच. काही काळासाठी मुक्त केलेल्या या महिला जीवनाचा मनमुराद आनंद घेताना व्हिडिओमध्ये दिसतात. काही स्केटिंग करतात, तर काही सायकल घेऊन वा-याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतात दिसतात. आता असा व्हिडिओ पुरुषी अहंकार ठासून भरलेल्या समाजाला थोडीच रुचणार त्यामुळे साहाजिकच यावर टिका होत आहे. पण काहींनी मात्र याचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महिलांच्या आनंदात सहभागी झाल्याने तुमच्याही चेह-यावर स्मित उमटेल हे नक्की.

VIDEO : दोस्त असावा तर असा! तिच्यासाठी दोन दिवस तो रेल्वेरुळावर बसून होता

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of burqa clad women from saudi women goes viral on social media