Viral Video : संस्कार म्हणजे मुलांना चांगले वळण देणे, शिस्त लावणे आणि एक चांगला माणुस घडवणे. संस्कार हे मुलांवर बालपणी केले जाते. बालपणी रुजवलेले संस्कार आयुष्यभर जपले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला बालपणी काही मुलांवर खूप चांगले संस्कार केल्याचे दिसून येईल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला लहान मुले भजन किर्तनात रमलेले दिसत आहे. हे छोटे वारकरी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांचे बालपण आठवेन. (Video of children warkari dance on bhajan songs video goes viral on social media netizens said this called real sanskar)
वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठल वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. हे वारकरी वर्षभर विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन असतात. गावात शहरात भजन किर्तन सोहळ्यात सहभागी होतात. या वारकऱ्यांमध्ये वयाचे बंधन नसते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण विठ्ठलभक्तीत तल्लीन झालेले दिसून येतात.
चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला चिमुकले वारकरी दिसतील आणि ते भजन गीत गात आणि टाळ वाजवत थिरकताना दिसत आहे. चिमुकल्या वारकऱ्यांचे हे नृत्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. चिमुकल्यांनी धोतर, बंडी घातली आहे. डोक्यावर पांढरी टोपी घातली आहे आणि अतिशय जल्लोषाने ते भजन गीतावर नृत्य सादर करत आहे. त्यांच्यातील जोश पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. या लहान मुलांवर झालेले हे सुंदर संस्कार कौतुकास्पद आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “संस्कार याच वयात होतात”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
journeywithnikhil08 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “संस्कार”
या व्हिडीओवर अनेक युजर्सन प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “होय! संस्कार याच वयात होत असतात.. खूपच अप्रतिम” तर एका युजरने लिहिलेय, “उद्याच भविष्य घडणार आजच वर्तमान” आणखी एका युजरने लिहिलेय, “माऊली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.