बसचालक आणि रिक्षा चालक भांडण करतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असेल. बसची तिकिट स्वस्त असते तर रिक्षाचे तिकिट बसपेक्षा थोडे महाग असते त्यामुळे प्रवासी रिक्षापेक्षा बसनी प्रवास करतात. त्यामुळे बस आणि रिक्षाची कायम जुंपलेली दिसून येते. सोशल मीडियावर बसचालक व रिक्षाचालकाच्या भांडणाचे, मारहाणीचे अनेक व्हिडीओ यापूर्वी समोर आले आहेत पण तुम्ही कधी बसचालक आणि रिक्षाचालकामधील प्रेम बघितले आहे? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बसचालक चक्क रिक्षाचालकाचा मदत करता दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (Video of City Bus & Auto Rickshaw’s Heartwarming Bond in Nashik Wins Hearts)
काय होत आहे व्हायरल?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक बस दिसेल. या बसच्या डाव्या बाजूला शेजारी एक रिक्षा दिसेल. हि रिक्षा बंद पडली आहे पण बसच्या मदतीने या रिक्षेला धक्का दिला जात आहे. एक व्यक्ती बसच्या पुढील दरवाज्यात उभा राहून रिक्षाला पायाने आधार देत आहे. बस आणि रिक्षामधील हे प्रेम पाहून कोणीही थक्क होईल. हा व्हिडीओ नाशिक भागातील आहे. ही बस नाशिक महानगरपालिका परिवहन महामंडळाची आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
unfilterednashik या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्याता आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आम्ही नाशिककर देतोच शेवटपर्यंत साथ ! ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पहिल्यांदा सिटी बस आणि रिक्षा वाल्याचं प्रेम दिसलं नाही तर कायम भांडत असतात” तर एका युजरने लिहिलेय, “दोन्ही शत्रु एकत्र” आणखी एका युजरने लिहिलेय, “अशा प्रकारची मैत्री तुम्हाला फक्त नाशिकमध्ये दिसेल” एक युजर मिश्किलपणे लिहितो, “हो बस ड्रायव्हर नक्कीच रिक्षा ड्रायव्हर सुद्धा असेल” तर एक युजर लिहितो, “स्नेह,विश्वास,आपुलकी,बंधुभाव यांचा गोडवा..” तर एक युजर लिहितो, “हे आमचं नाशिक आहे इथे मागे खेचणारे कमी आणि पुढे ढकलणारे खूप सारे मित्र आहेत”