Colleagues Arguing Over Hindi Use On Zoom Call Video Viral Fact Check : सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एका ऑफिसमधील झूम कॉलवर सुरू असलेल्या ऑनलाइन मीटिंगचा आहे, ज्यामध्ये कर्मचारी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. हिंदी भाषेत संवाद साधण्यावरून या मीटिंगमध्ये वाद सुरू असल्याचे दिसत आहे. एक सहकारी हिंदी समजत नसल्याने इंग्रजीमध्ये संवाद साधण्याचा आग्रह करत आहे. पण हा व्हिडीओ नक्की खरा आहे की नाही यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक व्हिडीओ खोटे किंवा एडिटेड असतात. दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ ट्विटरवर Ghar ke Kalesh नावाच्या अकांउटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दावा करण्यात आला आहे की, “एक माणूस हिंदी बोलत होता म्हणून ऑफिसच्या झूम मीटिंगदरम्यान सहकाऱ्यांसह वाद झाला.” पण, या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी इंडिया टुडेने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडीओ खोटा असल्याचे आढळून आले. व्हिडीओच्या निर्मात्याने पुष्टी केली की, “हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी बनवला गेला आहे.”

navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Video : Pune Traffic Surg
Pune Video : “नॉन पुणेकर परतले!” पुण्यातील ट्रॅफिक वाढलं, VIDEO होतोय व्हायरल
uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
jagadguru rambhadracharya ji on kharge sadhu
Video: “भारतात भगवाधारींनीच राजकारण करावं, सूट-बूट घालणाऱ्यांनी…”, जगदगुरू रामभद्राचार्यांचं विधान चर्चेत!
Congress Candidate Bunty Shelke
Bunty Shelke: काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा भाजपा कार्यालयात प्रवेश; प्रचार करतानाचा व्हिडीओ व्हायरल, नागपूरमध्ये नेमकं चाललंय काय?
Bigg Boss Marathi Jahnavi Killekar And Ghanshyam Darode
Video : छोटा पुढारी घन:श्याम मुंबईत येताच पोहोचला जान्हवीच्या घरी! चेष्टा करत म्हणाला, “आमच्या दाजींनी आग्रह केल्यामुळे…”

हेही वाचा – अयोध्या राम मंदिरासाठी ४८ घंटा बनवणारी खरी कंपनी कोणती? Video मुळे चर्चेत आलेला प्रश्न सुटला, पाहा खरी बाजू

याचबरोबर आज तक, इंडिया टाईम्स, न्यूज नाईन आणि मनी कंट्रोल यांसह अनेक न्यूज आउटलेटने व्हिडीओ खोटो असल्याचे सांगितले, हे उल्लेखनीय आहे.

व्हायरल व्हिडीओ कीफ्रेम्समध्ये (keyFrames) शोधल्यावर असे आढळले की, तो २२ डिसेंबर २०२३ रोजी राहुल सलीम नावाच्या व्यक्तीने Instagram वर शेअर केला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये एक टीप दिली आहे की, “हा व्हिडीओ मनोरंजनासाठी बनविला गेला आहे आणि कॉर्पोरेट जीवनाचे चित्रण करणारी एक रील आहे.”

इन्स्टाग्रामवरील या अकांउटवर, आम्हाला ऑफिस झूम कॉलदरम्यान अशाच प्रकारचे भांडण करणाऱ्या सहकाऱ्यांचे अनेक व्हिडीओ आढळले. याव्यतिरिक्त, या सर्व व्हिडीओंमध्ये दिसणारे काही लोक त्या व्हायरल व्हिडीओमध्येही दिसत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, “हा व्हिडीओ खोटा असून मनोरंजनासाठी बनवला गेला आहे.”

हेही वाचा – गायी वाहून नेणारं भारतीय मालवाहू जहाज हुथींच्या ताब्यात? कत्तलीसाठी नेत असल्याचा गंभीर दावा, खरं काय?

त्यानंतर अकांउट चालवणाऱ्या राहुल सलीम यांच्याशी संपर्क साधला. सलीमने इंडिया टुडेला सांगितले की, “हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे आणि पूर्णपणे मनोरंजनासाठी बनवला आहे.” तो पुढे म्हणाला की, “तो आता जवळजवळ एक दशकापासून कन्टेंट निर्माण करत आहे आणि आता VerSe इनोव्हेशनमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतो. व्हिडीओमधले लोक त्याचे सहकारी आहेत.

हेही वाचा – काही मिनिटांच्या अतंराने जन्मली जुळी मुलं तरी दोघांमध्ये आहे एका वर्षाचे अंतर; चिमुकल्यांच्या जन्मावेळी घडला दुर्मिळ योगायोग!

Video of colleagues fighting over Hindi during Zoom call is SCRIPTED not real
हिंदी बोलण्यावरून सहकऱ्यांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ खरा की खोटा? जाणून घ्या (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम, satheeshshanmu’s ,
rahul_salim’s )

सलीमने इंडिया टुडेला स्पष्ट केले, “व्हिडीओमागील एकमेव उद्देश स्पष्टपणे व्हायरल आणि मनोरंजक व्हिडीओ बनवणे हा होता. मी कॅप्शनमध्ये नमूद केल्याप्रमाणे, आम्ही सर्व भाषांचा आदर करतो आणि ते केवळ मनोरंजनासाठी होते.”

त्यामुळे मनोरंजनासाठी बनवलेला स्क्रिप्टेड व्हिडीओ ही खरी घटना म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.