इंग्रजी किंवा हिंदी सिनेमांमधून आपण अनेकदा चोरांना चित्र-विचित्र आणि अनाकलनीय पद्धतीने चोरी करताना पाहिले आहे. कधी कुणी चोरीसाठी वर्षानुवर्षे तयारी करताना दाखविले जातात; तर कधी केवळ सोपे वेशांतर करून लाखो रुपये लंपास केल्याचे आपण अशा चित्रपट किंवा मालिकांमधून पाहत असतो. मात्र, तुम्ही कधी कचऱ्याच्या बांधून ठेवलेल्या पिशवीला चोरी करताना पाहिले आहे का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेतील सॅक्रामेंटो, कॅलिफोर्निया येथे एका चोराने अत्यंत हुशारीने आणि जगावेगळ्या पद्धतीने चोरी केल्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नेमके काय आहे ते पाहू. हा व्हिडीओ घराबाहेर लावलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण घराच्या भिंतीला चिकटून एक काळ्या रंगाचे कुरिअर किंवा पार्सल ठेवले असल्याचे पाहू शकतो. आता व्हिडीओमध्ये आपल्याला हळूहळू एक काळ्या रंगाची कचऱ्याची पिशवी पुढे येताना दिसते.

हेही वाचा : एक ग्लास पाण्याची रेसिपी माहीत आहे का? हा व्हायरल Video पाहून जाणून घ्या; पोट धरून हसाल…

मात्र, त्या पिशवीचे नीट निरीक्षण केल्यास त्यामध्ये एक माणूस लपून बसल्याचे आपल्याला लक्षात येईल. चोराने स्वतःला एका कचऱ्याच्या पिशवीमध्ये दडवून तो घराजवळ जातो आणि भिंतीला लागून ठेवलेले पार्सल उचलून तिथून दबक्या पावलांनी हळूहळू चालत निघून जातो. या संपूर्ण व्हिडीओमध्ये त्या चोराचे केवळ पांढरे बूट आपल्याला दिसतात. अशा या आगळ्यावेगळ्या चोरीवर नेटकरी काय म्हणतात पाहा.

“या चोराला मानलं पाहिजे. प्रचंड हुशारीनं चोरी केली आहे,” असे एकाने म्हटले आहे.
“चोराला त्याची जागा माहीत आहे”, असे दुसऱ्याने उपहासाने म्हटले आहे.
“जर मला माझ्या कॅमेऱ्यामध्ये असे काही दृश्य पाहायला मिळाले, तर मला अजिबात राग येणार नाही,” असे तिसऱ्याने हसण्याच्या इमोजी टाकत म्हटले आहे.
“बापरे, हसून हसून डोळ्यांतून पाणी आले,” असे चौथ्याने लिहिले आहे.
“देवा! यांची बुद्धी तर खूपच चालायला लागली आहे,” असे पाचव्याने लिहिले आहे.

हेही वाचा : हे काय भलतंच! Breakup केला म्हणून प्रेयसीचे चोरून नेले टॉयलेट? पाहा हा Photo

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून ppv_tahoe नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत ४९५K इतके व्ह्युज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of creative thief stealing package in a disguise of a garbage bag went viral on social media dha