Eknath Shinde Viral Video : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगवेगळ्या कारणांनी नेहमी चर्चेत येतात. कामाव्यतिरिक्त ते कधी नातवाबरोबर होळी खेळताना दिसतात तर कधी देव दर्शन करताना दिसतात. एवढंच काय तर त्यांचे गावात शेती करतानाचे व्हिडीओ सुद्धा यापूर्वी व्हायरल झाले आहे. त्यांचा उत्साही स्वभाव अनेकांना थक्क करतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पाणीपुरीचा आस्वाद (Deputy CM Eknath Shinde Savoring Pani Puri)
चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या विसर्जन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आहे. या देवीची विसर्जन मिरवणूक ठाण्यातील कोपरी पूर्व या परिसरातून निघाली होती. यादरम्यान त्यांना वाटेत कोपरी परिसरातील लोकप्रिय पाणीपुरीचा गाडा दिसला आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याबरोबर पाणीपुरी आणि दहीपुरीचा आस्वाद घेतला. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एकनाथ शिंदे पाणीपुरी विक्रेत्याबरोबर संवाद साधताना सुद्धा दिसत आहे.
व्हिडीओत पुढे तुम्हाला दिसेल की पाणी पुरी खाल्ल्यानंतर ते खिशातून नोटांचे बंडल काढतात आणि काही नोटा सर्व्ह करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या हातात देतात. उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिलदारपणा सर्वांना आवडला. सोशल मीडियावर लोक कौतुकाचा वर्षाव करताहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दरवर्षी चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा सुद्धा हा उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एका गाण्याद्वारे विडंबन केले. या गाण्यात कुणाल कामरा याने एकनाथ शिंदेंचा उल्लेख गद्दार असा केला आहे. या प्रकरणी कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच कुणाल कामराच्याविरोधात गुन्हा देखील करण्यात आला आहे. कुणालला अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून केली जात आहे. सध्या हे प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेत आहे.