प्रवासाला जाताना आपली आई वाटेत खाण्यासाठी कोरडा खाऊ, पराठा किंवा ठेपला यांसारखे पदार्थ हमखास डब्यात भरून देते. रेल्वेमधून लांबचा प्रवास करत असताना त्या गाडीत मिळणारे खाद्यपदार्थ काही वेळेस ताजे नसतात; बराचवेळ बनवून ठेवलेलं असतात. तसेच त्यांच्या किंमती काहींना अधिक वाटू शकते. म्हणून बरेचजण शक्यतो घरून बनवून आणलेले पदार्थ खाणे पसंत करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही जर सहकुटुंब अशा गाड्यांमधून प्रवास करत असलात, तर आपले आई-वडील हमखास खाऊचा एखादा मोठा डबा आपल्याबरोबर ठेवतात. सध्या अशाच एका कुटुंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कुटुंबातील सहा कुटुंबीयांनी अगदी घरी जेवतो त्याप्रमाणे संपूर्ण जेवणाचा मोठा बेत आणल्याचे दिसते.

हेही वाचा : ऐंशी वर्षांच्या आजोबांना मिळाले जीवदान! मृत घोषित केल्यानंतर कसा घडला ‘हा’ चमत्कार जाणून घ्या…

या व्हिडीओनुसार, समोरा-समोरच्या जागांवर बसून पेपर डिश आणि प्लास्टिकच्या चमच्यांचा मदतीने घरून बनवून आणलेले जेवण जेवत असल्याचे दिसते. यामध्ये पराठा, लोणचं आणि एका मोठ्या डब्यामध्ये पुलाव असल्याचे आपण पाहू शकतो. या व्हिडीओमध्ये फार काही वेगळे नसले तरीही नेटकऱ्यांनी मात्र यावर भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काहींच्या मते असे केल्याने रेल्वेमधील अस्वच्छता वाढते, तर काहींना हाच पर्याय योग्य असल्याचे वाटते. नेमके नेटकऱ्यांचे या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर काय मत आहे ते पाहूया.

“रेल्वेत मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा घरचे जेवणच भारी आहे.” असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने, “आम्हीसुद्धा असेच करतो. दोनवेळचे जेवणबरोबर बांधून घेतो. मात्र ते खराब होऊ शकते म्हणून मग सकाळचा नाश्ता IRCTC मधून केला जातो.” असे म्हंटले आहे. तिसऱ्याने, “आपल्या संस्कृतीचा असाच अभिमान असला पाहिजे. खूप मस्त” असे लिहिले आहे. “प्रवास करताना सर्वात आठवणीत राहणारी गोष्ट आहे ही; आणि सगळ्यांसोबत मिळून खाण्याने जेवणात खूपच मजा येते.” असे चौथ्याने म्हंटले आहे. तर शेवटी पाचव्याने, “ते सगळं ठीक आहे. पण मग नंतर तेच तेलकट हात इकडे-तिकडे लावून आणि कचरा करून रेल्वेचे डबे खराब करतात. बरं नंतर सफाईदेखील करत नाहीत.” अशी तक्रार केली आहे.

हेही वाचा : शाळेसाठी दिलेली बाटली पाहून नेटकरी हैराण; Video पाहून म्हणाले म्हणाले “आता शाळेत याला…”

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @rohan_rajput999 या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला असून त्याखाली, “खरंच, रेल्वे प्रवासात सर्व परिवाराबरोबर जेवण करण्यात वेगळीच मजा आहे. आणि गंमत म्हणजे, प्रवासादरम्यान खाण्यासाठी आम्ही तीन प्रकारचे पदार्थ आणले होते.” असे कॅप्शन लिहिले आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत, १६.४ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of desi family eating 3 course meal together in indian railway went viral on social media watch how netizens reacted dha
Show comments