Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात.काही लोक त्यांची कला सादर करतात तर काही लोक नवनवीन माहिती सांगताना दिसतात. काही लोक चांगले वाईट अनुभव शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गावची लोककला दाखवली आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला गावातील लोक ढोल नृत्य सादर करताना दिसतील.
एका तरुणाने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउटंवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलेय, “गावोगावी शेळ्या मेंढ्या घेऊन भटकंती करणारा धनगर समाज दिवसभर भटकंती करून रात्री आपल्या तांड्यावर विरंगुळा (मनोरंजन) म्हणून सामूहिक खेळलं जाणारे धनगरी गजी नृत्य (गजी ढोल). शेकडो वर्षांनी एका पिढी कडून दुसऱ्या पिढी कडे सोपवली गेलेली परंपरा आज ही अबाधित आहे….”
ढोलनृत्य – तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जपतात लोककला
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला गावातील परिसर दिसेल. गावातील मंदिराच्या परिसरात खुल्या मैदानावर काही गावातील लोक नृत्य सादर करत आहे. ते ढोल नृत्य सादर करताना दिसत आहे. ढोलच्या तालावर ते अप्रतिम अशा नृत्य कला सादर करताना दिसत आहे. ही पारंपारिक नृ्त्य कला पाहून कोणीही थक्क होईल. नृत्य सादर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळी ऊर्जा दिसून येत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “धनगरी गजी ढोलनृत्य, गावची लोककला. माझ गाव माझा अभिमान”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बरं वाटलं तरुण मुले पण यामध्ये आहेत आपली परंपरा आपणच पुढे नेली पाहिजे” तर एका युजरने लिहिलेय, “अतिसुंदर, जय मल्हार भावांनो” आणखी एका युजरने लिहिलेय, “आपल्या समाजाची अद्भुत कला आपण पुढच्या पिढीने व्यवस्थित जोपासली पाहिजे” एक युजर लिहितो, “लोककला नाही तर तो स्वाभिमान आहे धनगर असल्याचा” तर एक युजर लिहितो, “आपल्या परंपरा खूप लोप होत चालल्या, छान वाटले ही परंपरा अजून पण पुढे नेत आहेत आणि तरुण मुले पण सहभागी आहेत” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.