Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ तर आश्चर्यचकीत करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला कुत्र्‍यांमधील माणुसकी दिसून येईल. नेमकं काय घडलं, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

कुत्रा हा माणसाच्या अत्यंत जवळचा प्राणी आहे. कुत्रा आणि माणसाच्या मैत्रीची अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असेल. कुत्रा हा माणसाचा अत्यंत प्रामाणिक मित्र मानला जातो आणि वेळ आली तर तो मालकासाठी जीव द्यायलाही घाबरत नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला कुत्र्यांमधील माणुसकी दिसून येईल.

प्राण्यांमध्ये आहेत माणसांपेक्षा जास्त माणुसकी!

या व्हायरल व्हिडीओ एका अपार्टमेंटमधील आहे. व्हिडीओत तुम्हाला असंख्य कुत्रे दिसतील. एक कुत्रा खाली निवांत बसलेले दिसत आहे तर एक कुत्रा लिफ्टजवळ उभा आहे. काही चार पाच कुत्रे टेबलवर उभे आहे तिथे दोन तरुणी सुद्धा आहे.
पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की खाली निवांत बसलेल्या कुत्र्‍यावर एका तरुणीचा चुकून पाय पडतो आणि ती खाली पडते. ती जशी खाली पडते, तशी दुसरी तरुणी तिच्या जवळ येते पण त्याबरोबर त्या अपार्टमेंटमधील सर्व कुत्री या तरुणीच्या जवळ सहानभूतीने जमा होतात आणि तिला काय झाले बघतात.
कुत्र्यांमधील ही माणुसकी पाहून कोणीही थक्क होईल. हल्ली माणसांमध्ये माणुसकी दिसून येत नाही. पण कुत्र्यांच्या या कृतीने सर्व जण थक्क झाले आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “आजकाल प्राण्यांमध्ये माणसापेक्षा जास्त माणुसकी बघायला मिळते.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “उगाच नाही पाळीव प्राण्यांवर लोकं हल्ली एवढे जीव लावतात !” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या कुत्र्यांचे कौतुक केले आहेत तर काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.