Video
Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणार असतात. काही व्हिडीओ पाहून तर आपण आश्चर्यचकीत होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही प्रश्न पडेल की हे खरंय का? या व्हिडीओमध्ये एका नळातून पाणी वाहताना दिसत आहे. विशेष म्हणजे या पाण्याला कागदाचा स्पर्श झाला की कागदाला आग लागते. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. पाण्यामध्ये आग लागते, असे सर्वांना वाटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओ पचमढी येथील पिपरिया परिसरातील असल्याचा दावा केला आहे. तुम्हाला या व्हिडीओमध्ये एक पाण्याचा कुंड दिसेल. या कुंडाच्या दोन्ही तोंडाने पाणी वाहताना दिसत आहे. काही लोक या पाण्यामध्ये कागद भिजवताना दिसतात पण आश्चर्याची बाब म्हणजे हा कागद भिजत नाही तर चक्क पेटतो. अनेक जण आश्चर्याने एकदा नाही तर अनेकदा कागद पाण्यात भिजवून पाहतात. हो, पाण्यात मिक्स करताच या कागदाला आग लागते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण या व्हिडीओमध्ये हे प्रत्यक्षात करून दाखवले आहे. यामागील कारण अद्याप स्पष्ट नाही पण यामागे विज्ञान असेल, असा प्राथमिक अंदाज आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “दुनियेतील पहिली अशी जागा जिथे पाण्यामध्ये सुद्धा आगल लागते #पिपरिया पचमढी”
पाहा व्हायरल व्हिडीओ
filmii.captain या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पाण्यात सुद्धा आग !” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “विज्ञान आहे यामागे” तर एका युजरने लिहिलेय, “यामुळे बोलतो सायन्स ला अॅडमिशन घ्या. ती एक कूपनलिका आहे जिथे जमिनीच्या खालून पाणी येत असतं. तिथे पाण्यासोबत कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोक्साइड पण असते म्हणून ऑक्सिजनचा संपर्क येताच आग लागते” अनेक युजर्स हा व्हिडीओ पाहून अवाक् झाले आहेत.
(लोकसत्ता कोणत्याही प्रकारच्या अंद्धश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही.)