Wedding Card Viral Video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. लग्न म्हटलं की भरपूर कामे समोर येतात. नातेवाईकांचे मानपान, लग्नाची तयारी. त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे लग्नपत्रिका. कुटुंबाव्यतिरिक्त नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित करण्यासाठी, लग्नाची पत्रिका छापणे खूप महत्वाचे असते. अलीकडेच, अशाच एका लग्नपत्रिकेशी संबंधित एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही तुमच्या घरी आधीच आलेल्या लग्नपत्रिकेचे पोस्टमार्टम करायला नक्की सुरुवात कराल.

नुकताच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचेही डोळे पाणावतील. मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी लग्नाची पत्रिका घेऊन विमानतळावर पोहोचते, पण व्हिडिओमध्ये पुढे काय होते याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. वास्तविक, ती चोरी करताना पकडली जाईल याची भीती देखील न वाटता ती मुलगी लग्नपत्रिका घेऊन विमानतळावर पोहोचते. त्यानंतर व्हिडीओमध्ये कार्ड तपासत असताना लग्नपत्रिकेत ड्रग्ज आढळून येतात. परंतु उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलीला पकडण्यात येते. सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

( हे ही वाचा: बैलाने सीटबेल्ट बांधून केली चक्क बाईकची सफर; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण)

येथे पहा तपासणीचा करतानाचा व्हिडीओ

( हे ही वाचा: Viral Video: माणसाने पाण्यात शार्कसोबत केला रोमँटिक डान्स; व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे, जो लोक पाहत आहेत आणि खूप पसंत करत आहेत. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘लग्नाची पत्रिका असलेली मुलगी विमानतळावर पकडली गेली. कार्डमध्ये ड्रग्ज होते. काळजी घ्या. विमानतळावर कोणाकडूनही काहीही घेऊ नका. या व्हिडिओला आतापर्यंत १३९.२ व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ चार हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सही आश्चर्यचकित झाले असून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, छापे मारून काहीही होणार नाही. १०० रुपयांपेक्षा मोठ्या नोटा बंद कराव्या लागतील. मालमत्ता आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.

Story img Loader