Viral Video : शाळा हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. शाळा, शाळेचे मित्र मैत्रीण, शिक्षक हे कायम स्मरणात राहतात. शाळेच्या आठवणी नेहमी आपल्याला भावुक करतात. सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून आपल्यालाही शाळेची आठवण येते. शाळेचे जुने दिवस आठवतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडओमध्ये दहावीच्या विद्यार्थीनी शाळेच्या शेवटच्या दिवशी रडताना दिसत आहे. या सर्वांना भावुक झालेले पाहून तुम्हालाही अश्रु आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला विद्यार्थीनी नटून आलेल्या दिसेल. त्या साडी नेसलेल्या आहेत आणि सुंदर श्रृंगार करून आलेल्या आहे पण त्या खूश नाही तर खूप दु:खी आहे. या सर्व विद्यार्थीनींच्या डोळ्यात पाणी आहे. सर्व जणी भावुक झालेल्या आहेत. व्हिडीओत सांगितलेल्या माहितीनुसार, या विद्यार्थी दहावीतील असून त्या शेवटच्या दिवशी निरोप समारंभाला नटून आलेल्या आहेत. शाळेचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्या भावुक झाल्या आहेत आणि एकमेकांना मिठी मारत रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. काही लोकांना त्यांचे बालपण आठवेल तर काही लोकांना त्यांचे शाळेचे दिवस आठवतील. व्हिडीओवर लिहिलेय, “शाळेच्या पहिल्या दिवशी आपण रडतो, तेव्हा आपल्याला शाळा नको असते आणि जेव्हा शेवटच्या दिवशी रडतो तेव्हा शाळा हवी असते.”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

nil____17 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “१० वी २०२५” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “शाळेची आठवण तर येतेच पण काय करणार आता गेलेले दिवस परत येत नाही” तर एका युजरने लिहिलेय, “परत हे दिवस मित्र आणि मैत्रीण आयुष्यात भेटणार नाहीत. आमची दहावीची १९९८ ची बॅच आम्ही पंचवीस वर्षांनी गेट-टुगेदर ला भेटलो. खूप आनंद झाला होता कारण या मित्र-मैत्रिणीची यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही आयुष्यात…” आणखी एका युजरने लिहिलेय, “हो ना खरंच.. रडू आलं बघून आणि शाळेचे दिवस आठवून” एक युजर लिहितो, “गेले ते दिवस राहल्या त्या आठवणी” अनेक युजर्सना हा व्हिडीओ पाहून शाळेची आठवण आली आहे. काही युजर्सना त्यांच्या मित्र मैत्रीणींची आठवण आली आहे.

Story img Loader