Viral Video : पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये नेहमी स्त्रियांना दुय्यम स्थान मिळाले आहे. महिलांवरील वाढता अत्याचार, बलात्काराची प्रकरणे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकीकडे ‘मुलगी वाचवा मुलगी शिकवा’ चा नारा दिला जातो तर दुसरीकडे त्याच मुलींवरील अत्याचारांची मालिका सुरू आहे. अशावेळी मुलींनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी पुढे येणे गरजेचे आहे. आत्मसंरक्षणासाठी नवनवीन गोष्टी शिकणे महत्त्वाचे आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मुलींना शिवकालीन युद्ध कलेच्या प्रशिक्षण दिले जाते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. (Video of girls undergoing training in Shivkalin martial art for self-defense goes viral)

लाठी काठीचे प्रशिक्षण घेताहेत तरुणी ( girls undergoing training in Shivkalin martial art)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मोठे मैदान दिसेल. या मैदानावर मुलीच्या हातात लाठी काठी दिली आहे आणि तरुण मंडळी त्यांना शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षण देत आहे. लाठी काठीच्या साहाय्याने स्वत:चे संरक्षण कसे करायचे हे तुम्हाला या युद्ध कलेच्या प्रशिक्षणातून दिसून येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “आपल्या मुलीला रडणारी नाही तर लढणारी बनवा.” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

video of a young girl dance on 26 January
Video : “अशा शाळांवर कारवाई केली पाहिजे” २६ जानेवारीला तरुणीने सादर केलेला डान्स पाहून नेटकरी संतापले
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
ladies group dance on hi navri asli song from navri mile navryalla video
“ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली” नऊवारी साडी नेसून महिलांचा जबरदस्त डान्स; रातोरात VIDEO झाला व्हायरल
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल
Vishwas Nangare Patil told amazing poem of Suresh Bhat
Video : “कधीही हरल्यासारखे वाटेल तेव्हा हे ऐका” विश्वास नांगरे पाटील यांनी सादर केली सुरेश भटांची ही अप्रतिम कविता
madhuri dixit dances on dola re dole song at wrap up party
Video : २२ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स! पार्टीचं कारण होतं खूपच खास…
Shocking video in mumbai virar local train women fight video viral on social media spirit of mumbai
“आता जीव जाईल तिचा” विरार लोकलमध्ये महिलांनी अक्षरश: हद्द पार केली; भयंकर VIDEO पाहून विरार लोकलमध्ये चढताना १०० वेळा विचार कराल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

sahyadri_vastad या इन्स्टाग्राम अकाउंटवरन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शमध्ये लिहिलेय, “शिवकालीन युद्ध कलेच्या प्रशिक्षणासोबत आचार आणि विचारांची शिदोरी दिली जाते.. मन मनगट मेंदू सक्षम होतोच शिवाय विचारांनी महाराजांचा मावळा घडवला जातो… गेली १८ वर्षे ही शिवकालीन युद्ध केलेची सेवा अखंडितपणे सुरू आहे..
अखंड मर्दानी सेवा
जागर शिवकालीन युद्ध कलेचा
नाद मर्दानी बाज मर्दानी
जय शिवराय”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लाठी काठी च प्रशिक्षण हे तर प्रत्येक गावात असलंच पाहिजे सर्व महाराष्ट्र मध्ये” तर एका युजरने लिहिलेय, “जय शिवराय दीदी” काही युजर्सनी त्यांच्या गावात किंवा शहरात हे प्रशिक्षण दिले जाईल का, हे विचारले आहे. काही युजर्सनी तर व्हिडीओ पाहून हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader