Viral Video : सोशल मीडियावर अनेक जण व्हिडीओ फोटो शेअर करत असतात. काही जण डान्स गाण्याचे व्हिडीओ शेअर करतात तर काही लोक जुगाड सांगताना दिसतात. काही लोक त्यांना आलेले चांगले वाईट अनुभव शेअर करताना दिसतात तर काही लोक मजेशीर गोष्टी शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका तरुणीने तिच्या आजीबरोबरची व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग शेअर केली आहे. या व्हिडीओ कॉलमध्ये या आज्जी नाती एका गंभीर विषयावर मजेशीरपणे चर्चा करताना दिसत आहे. नेमका काय विषय आहे? आणि त्या कशाबद्दल बोलत आहे, याविषयी आपण जाणून घेऊ या.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला व्हिडीओ कॉलची रेकॉर्डिंग दिसत असेल. या व्हिडीओ कॉलवर आज्जी नाती संवाद साधत आहे.
नाती – मी टाकणार आता वडापावचा गाडा
आज्जी – कुठं
नाती – इथं बँग्लोरमध्ये
आज्जी – बँग्लोरमध्ये टाकल्यावर शिकणार का की गाडाच बसणार करीत..
नाती – ऑफिस झाल्यावर गाड्यावर जायचं ये की इकडे आपण दोघी वडापावचा गाडा टाकू. तु वडापाव वैगरे कर मी पैशाच्या गल्ल्यावर बसते. पैसे वैगरे घ्यायला
तुला येतो का वडापाव करायला?
आज्जी – येतो मला. सगळं येत मला. वडापाव करायला येतो. सगळं काय पाहिजे ते.. लाडू करायचे जिलेबी करायची, बर्फी करायची. विकू की मी करून देते, तू विक. पैसे तुला निम्मे, मला निम्मे.
तुला सगळं पैसे देऊन मी येडीबिडी हाय काय, होय ग? मला नको होय पैसे?
नाती – तू काय करणार मी असल्यावर तुला कशाला पाहिजे?
आज्जी – मला लागत नाहीत होय, कशाला पण
नाती – तू काय करणारे पैशाचं
आज्जी – काय करायचं ठेवायचं मागे होतील मागल्या माणसांना
नाती – मागे कोण आहेत आम्हीच आहे की मागे
आज्जी – तुम्हीच हाय की तोपर्यंत माझ्याजवळ असावे बरं वाटतं पैसे असले म्हणजे. पैसे असल्यावर मोठा जीव होतो. पैसा नसल्यावर बारीक जीव होतो. काय करायचं , कसं करायचं?
आज्जी नातीची बिझिनेसवरील चर्चा ऐकून तुम्हालाही हसू येईल. निरागस आज्जीला पाहून काही लोकांना त्यांच्या आज्जीची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
marathmoli_mulgi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गंभीर विषयावर चर्चा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हजार टक्के खरं आहे पैसा नसला की बारीक जीव होतो आणि पैसा असल्यावर मोठा” तर एका युजरने लिहिलेय, “तुझ्या पेक्षा आजी जास्त हुशार आहेत” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच आजीचा शब्द बरोबर आहेत जेव्हा माणसाकडे पैसा नसतो तेव्हा माणसाला त्याची किंमत कळते हे आजीने शब्दात सांगितले” ए युजर लिहितो, “आजी मलापण तुमच्या business मधे घ्या की” तर एका युजर लिहितो, “नाद करायचा नाही आजीचा”