जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी गेल्या वर्षी देशात आल्यापासून सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. भारतीय खाद्यपदार्थांबद्दलच्या त्यांच्या आवडीमुळे त्यांना केवळ ऑनलाइन फॉलोअर्समध्येच त्यांना ओळख मिळालीच पण त्याचबरोबर भारतातील समृद्ध पाककलेच्या विविधतेबद्दल त्यांनी मनापासून कौतुकही केले.
सुझुकी यांनी नवी दिल्लीतील गजबजलेली बाजारपेठे सरोजिनी नगरला भेट दिली. यावेळी त्यांच्यासह त्यांची पत्नी, ए-को सुझुकी (Eiko Suzuki) आणि मायो(Mayo) एक लोकप्रिय हिंदी-भाषी जपानी युट्युबर देखील उपस्थिती होत्या. यावेळी सुझुकी यांनी येथील स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतला.
हेही वाचा – जीव मुठीत घेऊन मुंबई लोकलमध्ये चढणाऱ्या महिलांचा व्हिडीओ होतोय व्हायरल; सुरक्षेच्या मुद्यावरून पेटला नवा वाद
सुझुकी यांनी आनंददायी अनुभव त्याच्या चाहत्यांसह मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X(ट्विटर) वर शेअर केला आहे. “हिंदी भाषिक जपानी युट्युबर मेयो सान! आलू टिक्की दीजिये” सोबतचा अप्रतिम, देसी अनुभव,’ असे कॅप्शन त्यांनी पोस्टला लिहिले होते. व्हिडिओमध्ये सुझुकी हे स्ट्रीट फूडचा आस्वाद घेताना, विविध दुकाने शोधत असल्याचे दिसत आहेत आणि स्थानिक लोक आणि दुकानदारांबरोबर हिंदीमध्ये संभाषणात करताना दिसत आहे.
हेही वाचा –”ती स्त्री आहे…’, बंगळुरुमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेने वेळेचा केला सदुपयोग; कारमध्ये बसूनच सोलले वाटाने, फोटो होतोय व्हायरल
राजदूताची भारतीय संस्कृतीबद्दलची खरी आवड आणि समाजाच्या सर्व स्तरातील लोकांशी संपर्क साधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांना नेटकऱ्यांनी त्यांचे कौतूक केले आहे. सुझुकी यांचा भारतीय खाद्यपदार्थ खाताना पहिल्यांदाच व्हायरल झाले नाही. या वर्षाच्या सुरुवातीला असाच भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाचा व्हिडिओ चर्चेत आला होता ज्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. त्यांनी सुझुकी यांचे भारतातील खाद्यसंस्कृतीच्या विविधतेच्या नाविन्यपूर्ण सादरीकरणाबद्दल कौतुक केले.