मानवी नातेसंबंधांमधील प्रेमाची अशी अनेक उदाहरणे आहेत, जी शतकानुशतके लोकांमध्ये कायम लक्षात राहण्यासारखी आहेत. माणसांसारख्याच भावना प्राण्यांच्याही असतात, असं म्हणतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला याचा अंदाज येईल. या व्हिडीओमध्ये एक घोडा वेगाने धावणाऱ्या रुग्णवाहिकेच्या मागे धावताना दिसत आहे. रस्त्यावरील असे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. हा घोडा या रुग्णवाहिकेच्या मागे का धावत होता असा प्रश्न सारेच जण विचाराताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्यांना असं वाटतंय की प्राण्यांना नात्याची समज आणि भावना नसते त्यांनी हा व्हिडीओ अवश्य पाहा. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ उदयपूरचा आहे. एका आजारी घोडीला रुग्णवाहिकेतून पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. यादरम्यान बहिणीसाठी रुग्णवाहिकेच्या मागे धावणारा हा घोडा न थकता तब्बल पाच मैलांचा प्रवास करत रुग्णालयात पोहोचला.

आणखी वाचा : गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे भांडण सोडवण्यासाठी गेला होता डिलिव्हरी बॉय, पुढे काय झालं, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अन् बघता बघता सारेच जण जमिनीत सामावले, अंगावर काटा आणणारा हा VIRAL VIDEO पाहाच

त्याची बहीण आजारी पडल्यानंतर घोडा शांत आणि उदार झाला होता, असे सांगितले जात आहे. आजारी घोडीला उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात नेत असताना घोडा रुग्णवाहिकेच्या मागे धावू लागला. हा व्हिडीओ पाहून अंदाज बांधता येतो की प्राणी नि:शब्द असले तरी त्यांनाही भावना असतात.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडीओवरील व्ह्यूज आणि लाईक्सचे आकडेच सांगत आहे की हा व्हिडीओ लोकांना किती आवडला आहे. त्याचबरोबर यूजर्सही या व्हिडीओवर त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत. युजर्स व्हिडीओवर उत्स्फूर्तपणे त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.