कॉलेज आणि कॉलेजचे दिवस म्हणजे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सर्वात खास आणि आठवणीत राहणारे असतात. कॉलेजच्या काळातील मैत्री, एकमेकांसह घालवलेले क्षण, केलेली धमाल-मस्ती याबद्दल सर्वांकडे कित्तीतरी भन्नाट किस्से असतील. मात्र त्याहीपेक्षा अधिक आठवणी या कॉलेज काळात हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे असतात. कारण हॉस्टेल हेच त्यांचे दुसरे घर आणि हॉस्टेलमधील मंडळी त्यांचे दुसरे कुटुंब बनलेले असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या हॉस्टेलमध्ये घालवलेले दिवस नक्की आठवतील. या व्हिडीओमध्ये काही तरुणींनी हॉस्टेलच्या खोलीत गुपचूप चिकनचा रस्सा बनवण्याचा जुगाड केलेला आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच हॉस्टेलच्या खोल्यांमध्ये अन्नपदार्थ बनवण्याची परवानगी नसते. मात्र रात्री-अपरात्री भूक लागल्यानंतर अनेक विद्यार्थी अशा भन्नाट युक्त्या वापरुन आपल्या जेवणाची सोय करतात. नेमके या व्हिडीओमध्ये तरुणींनी काय केले आहे ते पाहू.

हेही वाचा : “वर्गातल्या मुलींसमोर का केले ट्रोल”, म्हणत मुलांमध्ये जुंपली भांडण! हाणामारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा Video Viral!

सुरवातीला एका ताटलीमध्ये कांदा, बटाटा, सिमला मिरची अशा भाज्या मुलींनी चिरून ठेवल्या आहेत. आता चिकनचा रस्सा बनवण्यासाठी त्यांनी, पाणी तापवणारी इलेक्ट्रिक किटली घेतली आहे. या लहानश्या किटलीमध्ये सर्वप्रथम त्यांनी कच्च्या चिकनचे तुकडे टाकले आहेत. नंतर त्यामध्ये पाणी घालून चिरलेल्या सगळ्या भाज्या, तिखट, हळद, मीठ असे सर्व जिन्नस घालून लहानश्या चमच्याने तो रस्सा ढवळत आहेत.

किटलीमधील पाणी उकाळ्यानंतर शेवटी त्यात कोथिंबीरदेखील घातली आहे. असा सर्व खटाटोप केल्यानंतर सर्व मुलींनी एकत्र बसून हा जुगाड वापरून तयार केलेला चिकनचा रस्सा अगदी मजेने खाल्ला आहे. असे आपण शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @tanushree_khwrkpm नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या पाहा.

“तुम्ही फार नशीबवान आहेत.. आमच्या हॉस्टेलमध्ये तर अशी इलेक्ट्रिक उपकरणे आणण्यास मनाई होती.” असे एकाने म्हंटले आहे. दुसऱ्याने, “बापरे! आता ती किटली धुणे म्हणजे भयंकर काम आहे!” असे लिहिले आहे. “तुम्ही या लहानशा किटलीमध्ये चिकन कसं बनवलं काय माहित… मी तर आपल्या नेहमीच्या नुडल्सदेखील बनवू शकत नाही. कायम जाळून जातात. आणि मला माझ्या किटलीचा तर कधीकधी शॉकदेखील बसतो.” असे तिसऱ्याने म्हंटले आहे. “हॉस्टेलमध्ये राहणारी व्यक्ती अशा किटलीमध्ये काय वाट्टेल ते शिजवू शकते.” असे हसून चौथ्याने म्हंटले आहे. तर शेवटी पाचव्याने, “आम्ही तर स्टीलच्या बादलीत जेवण बनवतो.” असे म्हंटले आहे.

हेही वाचा : “मी ऑर्डर पोहोचवणार नाही…; काय हवं ते करा” म्हणतो Swiggy कर्मचारी; पाहा ही व्हायरल पोस्ट

सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर त्याला आत्तापर्यंत, ११.३ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहे. तर ३७८K लाईक्सदेखील मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of hostel girls cooking chicken curry in electric kettle went viral netizens are amazed watch dha
Show comments