Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. डान्सपासून जुगाडपर्यंतचे व्हिडीओ चर्चेत येतात. काही लोक त्यांच्या कला दाखवतात तर काही लोक त्यांचे चांगले वाईट अनुभव शेअर करतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या व्हिडीओमध्ये एका तरुणाने आईचा व्हिडीओ शेअर करत त्याची आई तरुणपणी कशी दिसायची, याविषयी सांगितले आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

आई आणि मुलाचे नाते हे जगावेगळे आहे. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. मुलांचे आईविषयीचे प्रेम आणि काळजी दिवसेंदिवस वाढत जाते. या तरुणाने आताचा आईचा व्हिडीओ शेअर करत ती तरुणपणी कशी दिसायची, हे सांगितले आहे. त्याने आईचा जुना फोटो शेअर केला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सुरुवातीला या तरुणाची आई दिसेल. त्याच्या आईचे वय ५० ते ६० दरम्यान असेल. पण तुम्ही कल्पना करू शकता का की त्याची तरुणपणी कशी दिसायची? या व्हिडीओत पुढे तो त्याचा आईचा फोटा दाखवतो. त्या व्हिडीओमध्ये त्याची अत्यंत सुंदर, सुरेख दिसत आहे. अगदी १८-१९ वर्षांच्या या काकूंचा फोटा पाहून कोणीही थक्क होईल. आयुष्य कसं बदलतं आणि वयानुसार माणसाचे व्यक्तिमत्व कसे बदलते, हे तुम्हाला या व्हिडीओतून दिसून येईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

chalty_ki_oo या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कशी दिसते बघा आई तरुणपणी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ह्या जगात आई पेक्षा सुंदर काहीच नाही” तर एका युजरने लिहिलेय, “दादा तुझ्याजवळ जगातील सर्वात सुंदर संपत्ती आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर”

या तरुणाचे नाव जय जाधव असून तो इचलकरंजीचा आहे. त्याच्या आईला ब्रेन स्ट्रोक झाला. त्यामुळे शरीराची एक बाजू अर्धांगवायु झाली आहे. तो त्याच्या खूप काळजी घेतो. त्याच्या आईबरोबरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो.