समजा तुम्ही निर्सगाच्या सानिध्यात आपल्या कुटुंबियासोबत रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत असाल अणि अचानक तुमच्या समोर एक अजस्त्र मगर आली तर? कल्पना करूनच घाम फुटला ना? अशावेळी तुम्ही एकतर जीव मुठीत घेऊन असाल तिथून धूम ठोकाल किंवा निडर होऊन त्या मगरीला बघत बसाल. फ्लोरिडातल्या कुटुंबाने मात्र दुसरा पर्याय स्वीकारायचे ठरवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral Video : गावक-यांनी १५०० किलोच्या अजस्त्र मगरीला दिले जीवनदान

VIDEO : घोरपडीच्या सुटकेचा थरार रेकॉर्ड करायला कॅमेरामनला लागली दोन वर्षे

फ्लोरिडातल्या लेकलँडमध्ये पर्यटनासाठी रविवारी एक कुटुंब आले होते. हे कुटुंब या भागात फिरत असताना अचानक १२ फूट लांब आणि हजारो टनांची मगर त्यांच्या अगदी समोरून गेली. एवढी अजस्त्र मगर नजरेस पडणे तसे दुर्मिळच. त्यामुळे या मगरीला घाबरून पळून न जाता, या कुटुंबियांनी असा दुर्मिळ योग आपल्या कॅमेरामध्ये कैद केला. त्यापासून काही फूट अंतरावरून ही अजस्त्र मगर ऐटीत चालत गेली.  हे सारे दृश्य पर्यटक आ वासून तिच्या अजस्त्र शरीराकडे पाहत राहिले. तिच्या येण्याने दहशत जाणवली पण या दुर्मिळ प्रसंगातून पळून न जाता या पर्यटकांनी तिचे शेकडो फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केले. या भागात अनेक पर्यटक रविवारी पर्यटनासाठी येतात पण असा दुर्मिळ योग पाहायला मिळणे क्विचितच होते. येथील वनविभाग आयोगाच्या माहितीनुसार या भागात साडे चौदा फुटांची मगर देखील पाहिली गेली आहे.