भटक्या कुत्र्यांशी मोठ्या धीटाईने लढणाऱ्या छोट्याशा मुलाचा व्हिडिओ एव्हाना तुम्ही पाहिला असेलच. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘ म्हणून मुलींवर कधी विश्वास ठेवू नका’ अशी उपरोधिक ओळ लिहिलेली ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान गाजतेय. एक लहान मुलगा आणि मुलगी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जात असताना काही भटक्या कुत्र्यांनी त्या दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चार पाच कुत्र्यांना पाहून छोट्या मुलीने मुलाला एकटं सोडून धुम ठोकली. तेव्हा तुम्हाला कळलं असेलच की अशी ओळ लिहून हा व्हिडिओ व्हायरल का झाला असावा ते.
हा झाला गंमतीचा भाग. पण मैत्रीण सोडून निघून गेल्यानंतरही हा चिमुरडा घाबरला नाही. समोर अनेक कुत्रे उभे होते. ते आपल्यावर हल्ला करतील याची भीती होतीच पण त्याने धीटाईने या कुत्र्यांचा सामना केला. आपल्या चेहऱ्यावर भीती दिसली तर आपलं काही खरं नाही हे त्याला माहिती होतं तेव्हा, मोठी हिम्मत दाखवत त्याने कुत्र्यांच्या तावडीतून सुखरूप पळ काढला. हैदराबादमधले हे सीसीटीव्ही फुटेज असून रात्री पाऊणच्या सुमाराची ही घटना आहे. आता भटक्या कुत्र्यांना पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. पण एवढ्या कमी वयातही अतिशय संयमीपणे संकट परतवून लावलेल्या या चिमुरड्याचे कौतुक झालेच पाहिजे नाही का!