घरामध्ये अनेकजण एखादा कुत्रा, मांजर असे प्राणी पाळत असतात. काही मालक त्यांच्या पाळीव कुत्र्यांना खास ट्रेनिंगदेखील देतात. ते कुत्रेही मालक शिकवत असलेल्या सर्व गोष्टी मनापासून शिकून, ते सांगतील तेव्हा करून दाखवतात. तसे बरेच व्हिडीओ व्हिडीओसुद्धा दररोज सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सध्या अशाच एका व्हिडीओची इंटरनेटवर चर्चा सुरु आहे. या व्हिडीओमध्ये एक पाळीव कुत्रा आपल्या मालकांसाठी तीन पाण्याने भरलेले ग्लास एकाच वेळी घेऊन जात आहे. मात्र आता एखादा प्राणी तीन ग्लास मनुष्याप्रमाणे हाताने उचलू शकत नाही. मग हे त्याने कसे बरे केले असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
तर व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार, पाळीव कुत्र्याने आपल्या तोंडामध्ये एक लाकडी फळी धरली आहे. त्या फळीच्या दोन्ही बाजूंना पाण्याने भरलेला एक-एक ग्लास ठेवला आहे; आणि तिसरा ग्लास हा कुत्र्याच्या डोक्यावर ठेवण्यात आला आहे. आता हे तीनही ग्लास आणि त्यामधील पाणी जराही खाली पडू न देता, अत्यंत सावधानतेने तो कुत्रा एकेक पाऊल टाकत आहे.
असे करत असताना त्या श्वानाची नजर त्या ग्लासांवर आणि मालकावर सतत भिरभिरते आहे असेही आपण पाहू शकतो. मात्र खरंच ग्लासातील एकही थेंब खाली न सांडता अगदी कुशलतेने त्या पाळीव कुत्राने ते तीन ग्लास मालकाजवळ आणेल आहेत.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @dripfate या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया लिहिल्या आहेत, त्या पाहू.
हेही वाचा : एका ‘लिपस्टिकने’ केले चिमुकलीचे रडणे सेकंदात गायब! व्हायरल Video पाहून पोट धरून हसाल!
“बापरे.. या प्राण्यांना अशा भन्नाट गोष्टी करायला कोण शिकवतं?” असे एकाने कुतूहलाने विचारले आहे. दुसऱ्याने, “त्या कुत्र्याच्या डोळ्यात भीती अगदी स्पष्ट दिसते आहे.” असे लिहिले आहे. तिसऱ्याने, “जेव्हा आई मला घरीआलेल्या पाहुण्यांना पाण्याचे ग्लास देण्यासाठी सांगते तेव्हा मी सुद्धा अशीच दिसते.” असे लिहिले आहे. तर शेवटी चौथ्याने, “कृपया आपल्या पाळलेल्या कुत्र्यांना असे काही शिकवू नका. कारण- ते आधी डोक्यावर पाण्याचे ग्लास बॅलन्स करायला शिकतील. त्यानंतर गणित, विज्ञान आणि इतर विषयांमध्ये मनुष्यापेक्षा अधिक हुशार होऊन दाखवतील” असे म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @dripfate या अकाउंटने शेअर केलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत २४.२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.