World wrestling entertainment च्या (WWE) माध्यमातून जगभरात लोकप्रिय असलेलं नाव म्हणजे ‘द ग्रेट खली’. खलीचे असंख्य चाहते जगभरात पसरलेले आहेत. खलीसुद्धा सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो विविध फोटो आणि व्हीडिओजच्या माध्यमातून आपल्या अपडेट्स देत राहतो. आता नुकताच खलीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला. हा त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला लोक भरभरून कमेंट्स आणि लाईक्स देण्यासह तो शेअरसुद्धा करत आहेत.आपल्या खासगी आयुष्यात खली अतिशय शांत, कूल माईंडेड असं व्यक्तिमत्व आहे. लोकांना खलीचा परफॉर्मन्स आवडतोच, मात्र सोबत त्यांचं व्यक्तिमत्वही खूप भावतं. मात्र हा व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा अवाक् झाले आहेत. कारण खलीने चक्क डायनासॉर गिळला आहे.
खली अनेकदा तो आपल्या चाहत्यांच्या विनंतीचा स्विकार करून त्यांच्यासाठी विनोदी व्हिडीओ शेअर करतो. हा व्हिडीओ देखील तसाच आहे. त्यानं एका डायनासॉरचं खेळणं गिळत असल्याचा अभिनय केलाय. पण डायनासॉर गिळल्यानंतर त्यानं जे काही हावभाव केला ते पाहून खरंच तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही. खलीच्या या विनोदी व्हिडीओवर नेटकरी सुद्धा गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. खली एक उत्तम अभिनेता होऊ शकतो असं एका युजरनं म्हंटलं आहे तर, दुसऱ्याने अॅक्टींगबाज खली अशी प्रतिक्रिया दिली आहे. खलीने मजेदार व्हिडिओ शेअर करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील त्याचा असा हटके अंदाज चाहत्यांनी पाहिला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – सेम ड्रेससाठी दुकानातच महिलांचा आखाडा! महिलांची फ्री स्टाईल हाणामारी, तुम्ही पाहिला का VIDEO?
द ग्रेट खली एक व्यावसायिक पैलवान आहे. खलीचा जन्म २७ ऑगस्ट १९७२ मध्ये हिमाचल प्रदेशात झाला. त्याचं खरं नाव दिलीप सिंह राणा आहे. त्यांचं लहानपण प्रचंड हलाखी आणि संघर्षात गेलं. २ जानेवारी २००६ रोजी WWE च्या करारावर सही करणारा खली पहिला भारतीय पैलवान ठरला.