भारतीय लग्न म्हणजे दिव्यांचा झगमगाट, प्रचंड पाहुणे मंडळी, भव्य सजावट, विविध प्रकारचे अन्नपदार्थ आणि घोड्यावरची वरात. असा लग्नाचा चांगलाच तामझाम बघायला मिळतो. आपल्या लग्नात आपली ‘एंट्री’ ही सगळ्यांच्या लक्षात राहिली पाहिजे यासाठी नवरा-नवरी केवढे काय काय करतात. काही अशा खास दिवसासाठी रथ मागवतात; तर सध्याच्या ट्रेंडनुसार थेट क्रेनच्या मदतीने हवेतून मंडपात येतात, काही महागड्या गाड्या भाड्यावर घेतात, तर काही अगदी पारंपरिक पद्धतीने बॅण्ड-बाजा अन् घोड्यावरून लग्नमंडपात येतात. मात्र, सोशल मीडियावर शेअर झालेल्या या लग्नाच्या वरातीत नवरा चक्क युलू गाड्यांच्या ताफ्यासोबत मंडपात आल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @traaexploreweddings या अकाउंटद्वारे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्याला लाल रंगाचा फेटा घातलेल्या नवऱ्यामुलासह इतर नटूनथटून तयार असणाऱ्या वरातींना युलू या इलेक्ट्रिक बाइक्सवरून वाजत-गाजत मंडपात येताना पाहायला मिळते. या व्हिडीओला ‘युलू बाइक्सवरची वरात, बंगळुरू’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

हेही वाचा : साध्या ‘राजमा चावल’साठी भरावे लागले ‘इतके’ रुपये! विमानतळावर अन्नाच्या नावाखाली होत आहे लूट? पाहा

या भन्नाट व्हिडीओने सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. काहींना या पर्यावरणास अनुकूल असणाऱ्या बाइक्सवरून काढलेली वरात फारच पसंत पडली असली तरी काहींना मात्र हा केवळ थिल्लरपणा वाटत आहे. काय आहेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा.

“बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना त्रास न देता, आणलेली ही वरात मस्त आहे,” असे एकाने म्हटले आहे. “हे नक्कीच दोन इंजिनियर्सचे लग्न असणार आहे,” असा अंदाज दुसऱ्याने बांधला आहे. तिसऱ्याने, “मधेच बॅटरी संपली तर,” असा प्रश्न केला आहे. “युलू बाइक्ससाठी हे उत्तम मार्केटिंग होऊ शकते,” असे चौथ्याने सुचवले. तर शेवटी पाचव्याने, “… आणि सगळे म्हणतात की आमच्या शहरात जास्त ट्रॅफिक असतो!” असा टोमणा मारल्याचे आपण पाहू शकतो.

युलू इलेक्ट्रिक बाइक्स या दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अगदी सोईच्या आणि विशेष गाड्या देऊ करणारा एक मोबिलिटी स्टार्टअप आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आतापर्यंत याला १.४ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of indian wedding baraat on yulu electric scooter in bangalore is going viral on social media dha