Viral Video :सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण आवडीने डान्स करतात. काही जण इतके सुंदर डान्स करतात की त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधथ्ये एक महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. ही महिला कोणी लावणी कलाकार नाही तर जिल्हा परिषदेत काम करणारी कर्मचारी आहे. या महिला कर्मचाऱ्याचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला स्टेजवर सुंदर लावणी नृत्य सादर करताना दिसेल. ती चंद्रा या गाण्यावर लावणी सादर करताना दिसत आहे. तिचा पेहराव, डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणालाही वाटेल की ती अस्सल प्रसिद्ध लावणी कलाकार आहे. पण असे काहीही नसून ती सोलापूर जिल्हापरिषदेत काम करणारी कर्मचारी आहे. या कर्मचाऱ्याची ही कला पाहून कोणीही थक्क होईल. ती सोलापूर जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी सांस्कृतिक महोत्सवात नृ्त्य सादर करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून या महिला कर्मचाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

rohitpatilspeaks या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आम्हीही कलेत कमी नाही…जिल्हा परिषदेच्या अधिकारी सांस्कृतिक महोत्सवात एका महिला कर्मचाऱ्याने चंद्रा या गाण्यावर नृत्य सादर केले”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम छान झक्कास अभिनंदन मॅडम” तर एका युजरने लिहिलेय, “खूप खूप छान अप्रतिम कला हि आपल्या भारताची संस्कृती आहे आणि कलाकारांना सन्मान मिळालाच पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “अभिनंदन मॅडम तुम्ही खुप सुंदर कला सादर केली… आपल्यातील कलेला कोण काय म्हणते याकडे लक्ष न देता न्याय हा दिलाच पाहिजे..” एक युजर लिहितो, “आपले कर्तव्य करीत असताना आपण आपले छंद जोपासायला पण आवड लागत असते” तर एक युजर लिहितो, “अतिशय सुंदर सादरीकरण”