नोकरीत, प्रेमात, अभ्यासात, राजकारणात सगळ्यांना कधी ना कधी नारळ मिळतो. महानगरपालिका निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत त्यामुळे नारळ बिरळ म्हटलं की अनेक चेहरे आठवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पण सॅड जोक्स न आवडणाऱ्या बाकीच्या आपल्या सगळ्यांना उन्हाळ्याच्या दिवसात नारळ म्हटलं की शहाळं आठवतं, त्यातलं खोबरं आठवतं, आपण जिच्याबरोबर ते शेअर केलं होते ती व्यक्ती आठवते, त्यानंतर जीवनाचं झालेलं खोबरं आठवतं…(ओके बास)

तर मुद्द्याची गोष्ट, शहाळंवाल्याला भाव विचारून बारगेनिंग होऊ तो ते सोलून देईपर्यंत अर्धा जीव गेलेला असतो. अशा वेळी तुमच्या मदतीला पी. डाॅमनिक विठ्ठलासारखा धावून येऊ शकतो

ओके वाचा परत वरचं वाक्य पण तोपर्यंत पी. डाॅमनिकचे १२४ नारळ फोडून झालेले असतील. हा व्हिडिओ पाहा

सौजन्य-यूट्यूब

केरळचा हा पी. डाॅमनिक केरळ सरकारच्या रोड आॅथोरिटीमध्ये नोकरीला आहे. त्रिचूरमधल्या एका माॅलमध्ये झालेल्या एका स्पर्धेत पी. डाॅमनिकने एका मिनिटात १२४ नारळ फोडले. आणि तेपण हाताने. प्लीजच!

हा डाॅमनिक शाळेत असताना जाम भाईगिरी करायचा प्रयत्न करायचा. केसांना खोबरेल तेल लावून आलेल्या मुलांचा त्याला प्रचंड तिटकारा होता. पण त्यावेळी पी. डाॅमनिक काडी पैलवान असलल्याने त्याला या मुलांना ठोकता यायचं नाही. मनात असलेली इतक्या वर्षांची भडास त्याने त्रिचूरमध्ये त्याला मिळालेल्या नारळांवर काढली. नारळ दिला की डाॅमनिकने  तो फोडला , नारळ दिला की डाॅमनिकने तो फोडला, एका नारळाचे एका सेकंदात दोन तुकडे. नारळ एक तुकडे दो, नारळ एक तुकडे दो.

असं  करता करता भाईने १२४ नारळ फोडले की हो! आणि  पठ्ठ्या थेट गिनिज बुकात जाऊन बसला.

व्हिडिओ: ए भावा हा स्टंट तरी नको!

डाॅमनिकच्या शाळेबिळेमधली वर दिलेली माहिती मनावर घ्यायची नसली तरी डाॅमनिकने खरोखर वर्ल्ड रेकाॅर्ड केला आहे.

आपल्या पी. डाॅमनिकने जर्मनीच्या ‘एम. काहरीमानोविक’ चा वर्ल्ड रेकाॅर्ड मोडलाय!

या दुसऱ्या माणसाने फक्त ११८ नारळ फोडले होते.

तर भाऊ, नारळ मिळतो आणि तो मिळाला तरी लाईफमध्ये गडबडून नाय जायचं. पी डाॅमनिकला आठवायचं आणि पुढे जायचं.