Kid spends lifetime savings in Free Fire Game: मुलांना जन्म दिल्यानंतर पालकांवर एक मोठी जबाबदारी असते; ती म्हणजे त्यांना योग्य ती शिस्त, संस्कार आणि चांगली सवय लावण्याची. आजकाल अनेक लहान मुलं मोबाइलच्या आहारी गेले आहेत. मोबाइलशिवाय ते सुखाचा जेवणाचा घासही घेत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सगळ्या गोष्टींसाठी त्यांना मोबाइल हवा असतो. पण, याच चिमुकल्यांना मोबाइलची सवय कळत नकळत पालकांकडूनच लागते असं म्हणतात. या एका सवयीमुळे मुलांचं आयुष्य खराब होऊ शकतं. मोबाइलचं व्यसन लागल्यामुळे मुलांना आजूबाजूला नेमकं काय घडतंय हेदेखील कळत नाही. याच व्यसनामुळे मुलं चुकीच्या मार्गालादेखील लागतात. तसंच मोबाइलमध्ये गेम खेळायच्या नादात लहान मुलं भान विसरून जातात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका लहान मुलाने ऑनलाइन गेमच्या नादात कुटुंबाची आयुष्यभराची बचत गेममध्ये उडवली.

एका गेमसाठी उडवली आयुष्यभराची बचत

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका मुलाने त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यभराची सेव्हिंग्स एका गेममध्ये खर्च करून टाकली आहे. याची मुलाकडे विचारणा करत पालकांनी त्याला जाब विचारला आणि त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडीओमध्ये लहान मुलगा ढसाढसा रडताना दिसतोय आणि बेडवर जाऊन चादरीमध्ये लपण्याचा प्रयत्न करतोय. तो रडत असताना मी हे केलंच नाही असा दावा करताना दिसतोय.

तसंच त्या मुलाचा व्हिडीओ रेकॉर्ड करत त्याचे वडील त्याला जाब विचारतात आणि म्हणतात, “मग कोणी केलंय? सगळ्यांनी बघा हा असा एक मुलगा आहे ज्याने आपल्या घराचे पैसे कशाप्रकारे गेममध्ये लावले, सगळ्यांनी बघा.” यावर मुलाच्या नकाराची घंटा सुरूच असते. हे त्याने केलंय याचा स्वीकार तो व्हिडीओमध्ये करण्याचं टाळतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @theupdatedindia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “सात वर्षांच्या मुलाने आयुष्यभराची बचत फ्री फायर या गेमवर उडवली” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १८.४ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्याचा जाहीरपणे अपमान करू नका, तर त्याला खाजगीत शिस्त लावा.” तर दुसऱ्याने “मुलांना चूक आणि बरोबर यात फरक करण्याची पुरेशी समज नसते… ही पालकांची जबाबदारी आहे, त्यांना दोष देण्याऐवजी त्यांना योग्य मार्गाने मार्गदर्शन करावे” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “मुलाला दोष देणे आणि छळणे थांबवा… त्याचे हृदय इतके संवेदनशील आहे की जर त्याने काहीतरी वाईट पाऊल उचललं आणि स्वतःला इजा केली तर काय होईल, कृपया गोष्टींना समजूतदारपणे हाताळा.”