Viral Video : वारकरी संप्रदाय हा विठ्ठलाच्या भक्तांचा एक भक्तीपंथ आहे. या लोकांना वारकरी म्हणतात. दरवर्षी एकादशीला हे वारकरी पंढरपूरला वारीला जातात. वर्षभर गावात शहरात विठ्ठलाचे भजन किर्तन सोहळा आयोजित करतात व उत्साहाने साजरा करतात. जे किर्तन करतात, त्यांना किर्तनकार म्हणतात.
सध्या सोशल मीडियावर किर्तनकारांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अनेकदा किर्तनकार स्वत: त्यांच्या किर्तनातील क्लिप सोशल मीडियावर शेअर करतात. तर काही किर्तनकार टिव्हीवरील किर्तन विशेष मालिकेत सहभाग घेतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. सोनी मराठी या चॅनेलवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका किर्तनकार’ अनेक किर्तनकारांनी सहभाग घेतला आहे. यापैकी एका किर्तनकार महाराजांचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. किर्तनकार ह. भ. प. प्रमोद महाराज डुकरे हे इंग्रजीमध्ये किर्तन करतात आणि याविषयी ते परीक्षकाशी संवाद साधताना दिसतात. किर्तन हे जगभर गेलं पाहिजे, ही किर्तनाची गरज नाही, जगाची गरज आहे. इंग्रजीत किर्तन करणाऱ्या या महाराजांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या महाराजांचे नाव ह. भ. प. प्रमोद महाराज डुकरे आहे आणि ते मराठीसह इंग्रजी भाषेत किर्तन करतात. सोशल मीडियावर त्यांनी त्यांच्या एका इंग्रजी किर्तनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ते इंग्रजीमध्ये अगदी सोप्या भाषेत खूप सुंदर किर्तन करतात. सध्या त्यांनी ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका किर्तनकार’ या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कौतुकास्पद दादाराव खूप खूप अभिनंदन” तर एका युजरने लिहिलेय, “किर्तन जगभर गेलं पाहिजे राम कृष्ण हरी” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय सुंदर सांगितलं. भूषण जगन्नाथ महाराजांना प्रणाम” अनेक युजर्सनी या महाराजांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.