Viral Video : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा विविध समारंभात आवडीने उखाणे घेतले जातात. लग्न काळात नव वधू व वर या दोघांनाही नाव घेण्यासाठी म्हणजेच उखाणे घेण्यासाठी आग्रह केला जातो. उखाण्याद्वारे लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेतले जाते. सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अनेक जण आपल्या हटके शैलीमध्ये उखाणे घेतात. पूर्वी फक्त महिलांमध्ये उखाणा घेण्याचा क्रेझ होता आणि पुरुष मंडळी सुद्धा आवडीने उखाणा घेतात. (video of Kolhapur grooms amazing Ukhana for wife video goes viral on social media)
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव लग्नानंतर गृहप्रवेशाच्या वेळी उखाणा घेताना दिसतोय. विशेष म्हणजे नवरदेव खणखणीत कोल्हापुरी उखाणा घेतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
कोल्हापुरी उखाणा
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला नुकतेच लग्न झालेले नवरदेव नवरी गृहप्रवेश करताना दिसत आहे. गृहप्रवेश करताना नवरदेव नवरीला उखाणा विचारण्याची परंपरा आहे. त्यानुसार नवरदेवाला जेव्हा उखाणा घेण्यासाठी विचारतात तेव्हा नवरदेव कोल्हापुरी उखाणा सांगतो. त्याचा उखाणा ऐकून सर्व जण थक्क होतात.
नवरदेव म्हणतो, “वाघ आला वाघ, खातोय काय.. समर्थाचं नाव घ्यायला भितोय काय?” हा उखाणा ऐकताच नवरीसह इतर नातेवाईक जोरजोराने हसतात. हा कोल्हापुरी उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
just.shweta1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भावाचा खणखणीत कोल्हापुरी उखाणा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “थोड्या दिवसांनी वाघाचे रूपांतर बैलामध्ये होईल” तर एका युजरने लिहिलेय,”वाघ आहेस तु वाघ खरं. आताचं काय सांगू शकत नाही भावा” आणखी एका युजरने लिहिलेय, “थोड दिवस थांब भाई बकरी कधी होईल कळणार पण नाही” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.