कोणताही सण-उत्सव असो, पाऊस असो, उन्हाळा असो किंवा कोणतीही परिस्थिती असो, पोलीस सदैव आपल्या सेवेत हजर असतात. पण या पोलिसांनाही भावना असतात. लहान मुलांचे क्युट आणि गोड व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. लोकांना मुलांमधील निरागसता आवडते आणि म्हणून लोक या लहान मुलांकडे लगेच आकर्षित होत असतात. लहान मुलांचं मन निर्मळ असतं. लहान मुलं अनेकदा असं काहीतरी करतात, ज्यामुळे त्यांची निरागसता पाहून लोक या चिमुकल्यांमध्ये रमून जातात. यात हातातल्या दंडुक्याचा धाक दाखवणारे पोलीसही चिमुकल्यांना पाहून त्यांच्यामध्ये मिसळून जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एक महिला पोलीस अधिकारी आणि छोट्याश्या मुलीचा हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत आहेत.

पोलिस म्हटले, की धाक- दपटशा, दंडुका अशी काहीशी आपली समजूत असते. गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस नेहमीच त्यांच्या हातातल्या दंडुक्याचा वापर करत असतात. पोलिसांच्या हातातला दंडुका मागण्याचं धाडस एका चिमुकलीने केलंय. होय. लहान मुलं अतिशय निरागस असतात. लहान मुलांचं मन स्वच्छ असतं. म्हणून लहान मुलं जे काही करतात त्याने आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. या व्हिडीओमध्येही लहान मुलीने असंच काही केल्याचं पाहायला मिळतंय. या चिमुकलीने पोलिसाच्या हातातला दंडुका मागितल्यानंतर तिने काय प्रतिक्रया दिली हे पाहणं देखील फार सुखद अनुभव देतो.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

आणखी वाचा : Teachers Day 2022: मानवी तस्करीतून ४०० हून अधिक मुलांना वाचवणाऱ्या या शिक्षकाचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

हा व्हायरल व्हिडीओ कनिष्क बिश्नोई नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या अकाउंटवरील सर्व व्हिडीओ हे याच चिमुकलीचे आहेत. कनिष्क केवळ २१ महिन्यांची आहे. या व्हायरल व्हिडीओमध्य ही चिमुकली महिला पोलीस अधिकाऱ्याला तिच्या हातातला दंडुका मागताना दिसत आहे. कनिष्क तिच्या इवल्या इवल्या हाताने दंडुक्याकडे इशारा करत महिला पोलीस अधिकाऱ्याकडे वारंवार विनवण्या करताना दिसतेय. कनिष्कच्या गोंडसपणावर महिला पोलिस अधिकारी सुद्धा हळवी होते आणि तिच्याशी गप्पा मारू लागते. भरपूर वेळा दंडुका मागूनही पोलीस आपल्याला दंडुका देत नाही हे कळल्यानंतर चिमुकली काहीशी रागवते सुद्धा. पण त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील गोंडस हावभाव पाहण्यासारखे आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : शिक्षणमंत्र्यांनी सांगितले दारू पिण्याचे फायदे; म्हणतात, “पाणी मिसळून प्यायल्यास औषध बनतं…”

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : स्विमिंग पूलमध्ये बुडत होती आई, १० वर्षाच्या मुलाने असा वाचवला जीव, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. लोक हा व्हिडीओ पाहून कनिष्कच्या प्रेमात पडू लागले आहेत. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावरील दर्शकांचं चांगलंच मनोरंजन केलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ११.५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत तर ७ लाख १४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. सोबतच लोकांच्या सुंदर प्रतिक्रियांचा जणू महापूरच आलाय. या व्हिडीओवर कमेंट करत लोक कनिष्कच्या निरागसतेचं कौतूक करताना दिसत आहेत.