मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. उमेश पाल हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी अतिक अहमदचा मुलगा असद अहमद पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. त्यानंतर दोन दिवसांनीच पोलिसांच्या ताब्यात असलेला माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची तीन मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. या दोघांना पोलीस वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी घेऊन जात असतानाच माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरच मारेकऱ्यांनी अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर अनेकांनी योगी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी अतिक आणि अशरफ यांची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना घटनास्थळावरून अटक केली आहे. लवलेश तिवारी, सनी सिंह आणि अरुण मौर्य अशी या आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपींमधील लवलेश तिवारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

हेही वाचा- Atiq Ahmed Killed : अतिकच्या मारेकऱ्यांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या का? प्रत्यक्षदर्शींचा मोठा दावा, म्हणाले…

लवलेश तिवारीचा व्हिडीओ व्हायरल –

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –

अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या लवलेश तिवारीने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केलेले एक रील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्याच्या एका मित्रासोबत दिसत आहे. हे रील शेअर करताना लवलेशने जे गाणे वापरले आहे, ते ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. कारण त्याने या रीलमध्ये, ‘जंगल में शेर, बागों में मोर’ हे गाणे लावले आहे. तर हे गाणे त्याने दहशत निर्माण करण्यासाठी वापरल्याचेही काही नेटकरी म्हणत आहेत.

हेही वाचा- अंधश्रद्धेचा कळस! ‘या’ गावात २ अल्पवयीन मुलांचे चक्क भटक्या कुत्र्यांशी लावले लग्न

रीलवर संमिश्र प्रतिक्रिया –

फेसबुक अपडेटनुसार, लवलेश तिवारीने आपले नाव महाराज लवलेश तिवारी (चुचू) असे लिहिले आहे. फेसबुकवर त्याचे एकूण १ हजार ५३९ मित्र असल्याचे दिसत आहे. तर अतिक अहमद आणि अशरफची हत्या करण्यापूर्वीचे हे लवलेशचे शेवटचे रील आहे. या रीलवर नेटकरी सतत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, ‘तू शेर नाही, तर बब्बर शेर आहेस.’ या रीलवर काहींनी लवलेशने केलेल्या कृतीचे समर्थन केले आहे. तर काहींनी त्याचा निषेधही केला आहे.

Story img Loader