आपले आरोग्य उत्तम राहावे यासाठी अनेक जण आपल्या आहाराकडे खास लक्ष देत असतात. मांसाहार करणारे मासे, चिकन, अंडी व्यवस्थित शिजवून खातात. कारण- प्राण्यांच्या कच्च्या मांसामध्ये जीवजंतू असल्यामुळे आपण ते स्वच्छ धुतो आणि शिजवतो. अगदी क्वचित असे पदार्थ असतात; ज्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये कच्चे मासे म्हणा किंवा अंड्याचा बलक यांचे सेवन केले जाते. उदाहरणार्थ- सुशी, अंड्याचे हाफ फ्राय इत्यादी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, सोशल मीडियावर एक तरुण केवळ प्रयोग म्हणून दररोज पोट दुखेपर्यंत कच्चे चिकन खात असून, त्याचे व्हिडीओ शेअर करीत आहे. हा प्रयोग सुरू करून, त्याला १७ दिवस पूर्ण झाले आहेत. प्रयोग करणाऱ्या व्यक्तीचे नाव जॉन, असे आहे. कच्चे मांस खाण्याचे व्हिडीओ शेअर करण्यासाठी त्याने खास ‘Raw Chicken Experiment’ नावाचे इन्स्टाग्राम पेजदेखील बनविले आहे.

हेही वाचा : आईला सरप्राइज म्हणून बनवायचा होता भात; मात्र किचनची अवस्था पाहून तरुणालाही रडू आवरेना, Video पाहा

कच्चे चिकन खाण्याचा प्रयोग या व्यक्तीने जानेवारीमध्ये सुरू केला होता. कच्चे मांस खाण्याचा व्हिडीओ बनवून, तो आपल्या @rawmeatexperiment या पेजवरून शेअर करतो. कच्चे मांस खाणे आरोग्यासाठी सांगितले जाते, तेवढे घातक नाही, असा त्याचा ठाम विश्वास आहे.

“जेव्हा मला कुणी काही न करण्यास सांगते, तेव्हा मला तीच गोष्ट करण्याबद्दल अधिक उत्सुकता वाटू लागते. असेच काहीसे कच्चे चिकन खाण्याच्या बाबतीत झाले असावे,” असे त्याने पीपल [People] नावाच्या एका पाश्चिमात्य चॅनेलला माहितीत देताना सांगितले.

“आणि जरी मी आजारी पडलो तरीही केवळ पोटाच्या किरकोळ समस्या किंवा थोडीशी पोटदुखी होऊ शकते, असे मला वाटते. परंतु, या प्रयोगामुळे नेटकरी मला तब्येतीसाठी सतत सावधगिरीचा इशारा देत असतात. मात्र यामध्ये किती तथ्य आहे, यांचे उत्तर केवळ वेळ आपल्याला देऊ शकते.”असेही जॉन म्हणतो.

हेही वाचा : झोमॅटोवरून काय मागवले अन् काय मिळाले?; पाहा सोशल मीडियावर फिरणारा ‘Cake’चा मजेशीर किस्सा

अनेक डॉक्टरांच्या मते- हा प्रयोग अत्यंत घातक ठरू शकतो. “कच्च्या मांसामध्ये खासकरून चिकनमध्ये अनेक धोकादायक विषाणू असतात. त्यामुळे असे पदार्थ व्यवस्थित शिजवून खाणे आवश्यक असते,” असे ऑस्ट्रेलियामधील न्यू साउथ वेल्स, अन्न प्राधिकरणाने सांगितले असल्याची माहिती एनडीटीव्हीच्या एका लेखावरून मिळाली आहे.

या प्रयोगावर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या पाहू.

“हे खाऊन पोटात दुखत नाही का?” असा एकाने प्रश्न केला आहे. दुसऱ्याने, “पण हे असं सगळं करायचं तरी कशाला?” असे दुसऱ्याने विचारले आहे. तिसऱ्याने, “किमान त्या कच्च्या मांसावर चवीसाठी थोडं मीठ तरी टाकून खा..” असे लिहिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of man eating raw chicken meat for his own experiment went viral shocking for many netizens watch dha
Show comments