सोशल मीडियावर यूजर्सना आश्चर्यचकित करणाऱ्या व्हिडीओंची कमतरता नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल. तुम्ही या व्यक्तीच्या जागी असता तर एवढी गडबड केल्यावर नक्कीच डोकं धरून बसले असते. चूक झाली ती केवळ एका सेल्फीमुळे. सेल्फीची क्रेझ तुम्हाला माहीत आहेच. पण सेल्फीच्या नादात इतकं नुकसान झाल्यानंतर तुमची झोपच उडून जाईल. या व्यक्तीने बोटीत उभं राहून माशासोबत सेल्फी काढला. लागोपाठ सेल्फी काढल्यानंतर शेवटी असं काही घडतं की पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती बोटीत बसल्याचा आनंद घेतोय. त्याच्या एका हातात फोन आणि दुसऱ्या हातात मासा आहे. खरंतर मासा पकडल्यानंतर तो इतका आनंदी होतो की तो त्याच्यासोबत सेल्फी काढायला लागतो. पण माशासोबत सेल्फी काढण्यात तो इतका हरवून जातो की फोटो काढल्यानंतर जेव्हा मासा पाण्यात फेकण्याची वेळ येते तेव्हा तो माशाच्या जागी स्वःचा फोनच फेकतो. माशाऐवजी फोन फेकून दिल्याचं समजताच तो दु:खी होऊन पश्चाताप करतो आणि फोनकडे पाहण्यासाठी पुढे वाकतो.

आणखी वाचा : Viral Video : पार्टी करणाऱ्या लोकांना सिंहिणीने दिलं ‘सरप्राईज’, एका व्यक्तीच्या मागेच पडली!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : उगाच काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणत नाहीत…हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल!

हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवर तानसू येगेन नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ कोटी २५ लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. यावर यूजर्सकडून खूप मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. सुहाना नावाच्या यूजर्सने लिहिले की, “हीच खरी वेदना आहे.” समीर नावाच्या यूजरने लिहिले की, “मी अनेकदा चूका केल्या आहेत. पण माझ्या फोनच्या बाबतीत मी असं कधीच केलं नाही.”

Story img Loader