Ukhane Viral Video : उखाणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेऊन उखाणे घेतले जातात. हळदी कुंकूचा कार्यक्रम असो किंवो कोणत्या शुभ कार्याच्या वेळी उखाणा घेण्याची परंपरा आहे. पूर्वी महिलाच फक्त उखाणा घ्यायच्या आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने उखाणा घेताना दिसतात. नुकतीच मकर संक्रांत साजरी करण्यात आली त्या निमित्त्याने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमात महिलेची ओटी भरताना तिला उखाणा विचारला जातो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही विदर्भातील महिला भन्नाट उखाणा घेताना दिसत आहे. त्यांचे उखाणे ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमात काही महिला उखाणा घेताना दिसत आहे.
त्यापैकी काही उखाणे खालीप्रमाणे –
वांग्याच्या भाजीला थोडं खोबरं कुटलं
नारायणरावाबरोबर लग्न करून नशीबच फुटलं
नदीवर होता पूल
पूल केला मी पार
सचिन रावांनी बनवला मला रिलस्टार
मुंबई पाहिली, नंतर पाहिली अमेरिका
नंतर पाहिलं लंडन
गणेशराव आहे अजय देवगण तर
मी आहे रविना टंडन
डाग घातला, दागिना घातला
घातले होते जोडवे, पैंजन, चाळ
गौरी पोत दिसते बरी त्यात शोभे एक दाण्याची सरी
हिम्मतराव म्हणतात शारदा पात्रात असती चांदीची जरी तर तु दिसली असती स्वर्गाची परी
तुळशीसमोर काढते सुंदर रांगोळी
नीरजरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी
गळ्यात होतं मंगळसुत्र, मंगळसुत्रात होते काळे मणी
अनिल रावांचे नाव घेते मी आहे कुंकवाची धणी
चांदूर माझं माहेर सावळी माझे गाव
रावांचे नाव घेते कल्पना माझे नाव
साडी घालते फॅशनची
पदर लावते साधा
सचिनराव माझे कृष्ण
मी त्यांची राधा
या महिला बोली भाषेत म्हणजे विदर्भीय
भाषेत उखाणा सांगताना दिसतात. हा व्हिडीओ अडीच लाखांहून अधिक युजर्सनी लाइक केला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
shitalbawane51 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”मराठी उखाणे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला फक्त रविना टंडन चा उखाणा आवडला” तर एका युजरने लिहिलेय, “शेवटच खुपचं भारी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “वा छान उखाणे मस्त सुखी ठेव देवा या सर्व बहीणींना” एक युजर लिहितो, “सर्व विदर्भाचे आहे” अनेकांना या महिलांचे भन्नाट उखाणे आवडले आहेत. काही युजर्सनी असेच भन्नाट उखाणे सुद्धा कमेंट्समध्ये लिहिलेय.