सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही लहान मुलगी शहीद मेजर अक्षय गिरीश यांची आहे. अक्षय गिरीश २९ नोव्हेंबर २०१६ रोजी नगरौटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओत त्यांची मुलगी लष्कर वाईट लोकांशी लढण्यासाठी असल्याचं सांगत आहे. ही गोष्ट तिच्या शहीद वडिलांनीच तिला सांगितली होती. मुलीचा निरागसपणा लोकांना प्रचंड आवडत असून व्हिडीओ शेअर होत आहे. शहीद मेजर अक्षय गिरीश यांच्या आई मेघना गिरीश यांनी हा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

या व्हिडीओत नैना आपल्या वडिलांशी झालेलं बोलणं आठवत सांगत आहे की, ‘लष्कर आपल्यावर प्रेम करण्यासाठी आहे. लष्कर वाईट माणसांशी लढण्यासाठी आहे. लष्कर आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर मदत करण्यासाठी आहे’. मेघना गिरीश यांनी हा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर अनेकांनी रिट्विट केला असून यासोबत भावनात्मक पोस्टही लिहित आहेत.

२०१६ मध्ये तीन ते चार दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गणवेशात लष्कराच्या नगरौटा येथील कॅम्पवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन आर्मी मेजरसहित सात जवान शहीद झाले होते. याच हल्ल्यात नैनाचे वडील मेजर अक्षय गिरीश शहीद झाले होते.

Story img Loader