चित्रपटांमध्ये आपण अनेक हिरो, सुपरहिरो बघतो जे अनेकांचा जीव वाचवतात पण खऱ्या आयुष्यात तुम्ही अशा व्यक्तीला कधी भेटला आहात का? चित्रपटातील सुपरहिरो आकर्षक ड्रेस किंवा केप परिधान करतात, त्यांच्याकडे अनेक दैवी शक्ती असतात असे दाखवले जाते पण खऱ्या आयुष्यातील हिरोकडे कोणतेही आकर्षक ड्रेस किंवा केप नसते ना कोणतीही दैवी शक्ती नसते, त्यांच्याजवळ असतो दयाळूपणा आणि माणुसकी! ज्या व्यक्तीच्या मनात दया आहे आणि ज्यांच्या मनात माणुसकी जीवंत आहे तो व्यक्ती कधीही गरजूची मदत करण्यासाठी मागे हटत नाही मग तो मनुष्य असो किंवा पशू. अशाच एका खऱ्या आयुष्यातील हिरोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक कबुतर तारेमध्ये अडकल्याचे दिसत आहे ज्याचा जीव वाचवण्यासाठी काही तरुण मदतीला धावून येतात. व्हिडिओने लाखो नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. नेटकरी तरुणांच्या कृतीचे कौतुक करत आहेत.
तरुणांनी वाचवला कबुतराचा जीव
इंस्टाग्रामवर फिरत असलेल्या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये दिसते की विजेच्या तारांमध्ये एक कबुतर अडकले आहे. कबुतराचा जीव वाचवण्यासाठी दोन तरुण मदतीला धावून येतात. कबुतराला वाचण्यासाठी हे तरुण आधी जिथे कबुतर अडकले आहे तिथेच खाली रस्त्यावर एक कार उभी करतात. कारवर एक तरुण चढतो अन् कबुतराला वाचवण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा हात कबुतरांपर्यंत पोहचत नाही मग दुसरा तरुण त्याच्या मदतीला धावून येतो. एका तरुणाच्या खांद्यावर दुसरा तरुण बसतो आणि ते लोक कबुतराच्या जवळ पोहचतात. तारेत अडकलेल्या कबुतराची सुटका करतात.
NepalInReels या Instagram खात्याद्वारे हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”सर्व हिरो टोपी घालत नाहीत; काही त्यांच्या हृदयात दयाळूपणा ठेवतात. विजेच्या तारांमध्ये अडकलेल्या एका कबुतराला वाचवण्यासाठी दोन धाडसी तरुण एकत्र आल्याचे पहा. प्रत्येक जीवन महत्त्वाचे आहे याची आठवण!”
हेही वाचा – उड्डाणपुलावर ई-रिक्षाचालकाची स्टंटबाजी! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “भारतात सापडला फ्लाइंग सुपरमॅन”
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या दोघांचे कौतुक केले, अनेकांनी त्यांच्या निःस्वार्थ आणि धैर्यासाठी त्यांना खऱ्या आयुष्यातील हिरो म्हटले.