Viral Video : आपल्यापैकी अनेक जण आवडीने ऑनलाईन फूड मागवतात. भूक लागली की लगेच आवडते पदार्थ ऑनलाईन ऑर्डर करतात पण ऑनलाईन फूड ऑर्डर करताना काळजी घ्या. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. मनसे कार्यकर्त्यांनी एका पिझ्झा स्टोअरची पोलखोल केली आहे. एका चिमुकल्याने पिझ्झा खाल्ल्यानंतर त्याला दिवसभर उलट्या झाल्या. नेमकं हे कशामुळे घडले, हे या व्हिडीओत मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.
हा व्हिडीओ सतिश पाटील या मनसे कार्यकर्त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सतिश पाटील इतर मनसे कार्यकर्त्यांबरोबर एका पिझ्झा स्टोअरमध्ये तेथील कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करताना दिसत आहे. ते सांगतात, “एक ब्रॅण्ड आहे मोजो पिझ्झा म्हणून. त्या पिझ्झाची एका भावाने ऑर्डर केलेली. हा स्टोअर मॅनेजर आहे. यांच्या येथून पिझ्झा येतात. आज त्या लहान बाळांने पिझ्झा खाल्ला. एक नॉर्मल घास खाला. त्याने दिवसभरात एवढ्या उलट्या केल्या म्हणून शोधत ज्या स्वीगीवाल्याने झोमॅटोवाल्याने जो अॅड्रेस टाकलेला आहे, त्या अॅड्रेसवर हे दोन तास शोधताहेत की बाबा इथं भेटेल तिथे भेटेल. याच पद्धतीने ते शोधत आले. यानंतर आम्हाला यांचा स्टोअर आम्हाला दिसला. “
ते पुढे व्हिडीओत सांगतात, “स्टोअर दिसल्यानंतर यांच्या भाज्या ज्या तुम्ही बघू शकता (भाज्या दाखवतात) यांचा लोगो आहे इट क्लब म्हणजे खा आणि हे खायला (सडलेले टोमॅटो, शिमला मिरची दाखवत) हे टोमॅटो आहेत जे तुमच्या पिझ्झासाठी वापरले जातात. ही शिमला मिरची पाहा. त्यानंतर ते तेल दाखवतात. त्याच्यानंतर जे तुम्हाला सॉसेस आणि जे काही मिळतं (पॅकेट दाखवत) याला पाणी सुटलं. तुम्ही हे पिझ्झा सर्वकाही खाताय ऑनलाईन ऑर्डर करून… (त्यानंतर एक दुसरा कर्मचारी बुरशी लागलेली भाजी दाखवतो.) त्यात सर्वात भारी म्हणजे तुम्हाला आवडतं चिकन. वास घेऊ शकत नाही . एखादा गटारात पडलेला किंवा सडलेला असतो ना, तसा वास येतो.”
त्यानंतर सतिश पाटील अंडी, सॉसेस, बुरशी जन्य व खराब झालेले इत्यादी पदार्थ दाखवतात. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
https://www.facebook.com/reel/698820982718039
संतोष पाटील व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहितात, “आता तरी घरचे जेवण जेवा रे बाबांनो” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असे शॉप बंद केले पाहिजे. आणि फूड अँड सेफ्टी वाले काय करतात. ते कधी चेक करणार:- अन्न सुरक्षा विभागाला तक्रार करा: जर व्यवस्थापनाने योग्य उपाय न केल्यास, अन्न सुरक्षा विभागाला (Food Safety Department) तक्रार करा. तुम्ही अन्न सुरक्षा विभागाच्या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता किंवा त्यांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधू शकता. तुमच्या तक्रारीत हॉटेलचे नाव, पत्ता, आणि खराब अन्नाची माहिती नमूद करा.” तर एका युजरने लिहिलेय, “आपल्याच हातात आहे. बाहेर खाणे बंद करा. जन जागृती अभियान राबवले पाहिजेत. जनतेला आवाहन करा सर. बाहेरचे फूड खाऊ नये”
आणखी एका युजरने लिहिलेय, “दृष्टीआड सृष्टी छान! तसे ऑनलाईन फूड ऑर्डर करून त्यावर लोकं मस्तपैकी ताव मारतात. पण खरंच कोणाला माहीत असतं का की जिथे हे पदार्थ बनवले जातात तिथे किती स्वच्छता असते? जे पदार्थ वापरले जातात ते किती चांगले असतात? मागे दिल्ली साइडला जे चिकन मोमोज ची फॅक्टरी दाखवली ती अत्यंत गलिच्छ होती. कहर म्हणजे चिकन ऐवजी कुत्र्याचे मांस मोमोज मध्ये वापरले जात होते! हे विक्रेते लोकांच्या आरोग्याशी किती खेळतात?? या व्हिडिओच्या निमित्ताने यांचा पर्दापाश झाला!! आता तरी लोकं घरचं जेवण पसंत करतील! ही अपेक्षा!!” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.